योगेश्वरी नवरात्री नऊ दिवसांची पूजा - Yogeshwari Navratri 9 Days Puja

योगेश्वरी देवी म्हणजे साक्षात दुर्गा स्वरूप देवी आहे या देवीचा नवरात्र उत्सव काळ म्हणजेच शारदीय नवरात्र व जन्मोत्सव काळ म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष पौर्णिमा हा आहे. योगेश्वरी देवीचे मंदिर महाराष्ट्रातील आंबेजोगाई येथे आहे.. ज्या कुळातील लोकांची कुलस्वामिनी कुलदेवता योगेश्वरी आहे असे सर्वजण देवीचे नवरात्र करतात. या नवरात्री काळामध्ये देवीसाठी विशेष पूजन अर्चन करण्याची पद्धत आहे. योगेश्वरी देवी ही कुमारी का असल्याने या नवरात्र उत्सव काळामध्ये विशेष कुमारिका पूजन देखील केले जाते. आपल्या कुटुंबावर या देवीची विशेष कृपादृष्टी व्हावी यासाठी अनादी कालापासून सर्व भक्तगण देवी नवरात्र तसेच जन्मोत्सव करत आले आहेत.
पुराण काळातील आख्यायिकेनुसार श्री देवी योगेश्वरी ही पार्वती स्वरूप आहे या देवीचं एक स्वरूप गुहागर येथेही आहे तिथे दुर्गा स्वरूपामध्ये तिचे पूजन केले जाते याच दुर्गादेवी विवाह परळी येथील वैजनाथ यांच्याशी करावयाचे ठरले त्या विवाह प्रसंगी श्री दुर्गादेवी ने विवाह सोहळा सकाळी कोंबडा आरवायच्या आतच होईल अशी अट घातली होती हा विवाह सोहळा आंबेजोगाई येथील हत्तीखाना येथे पार पडणार होता ठरलेली अट पूर्ण न झाल्याने विवाह प्रसंगासाठी आलेल्या सर्व देवता या तिथेच मूर्ती स्वरूपात स्थित झाल्या आजही या देवता आपल्याला पहावयास मिळतात, तेव्हापासून योगेश्वरीदेवीचे वास्तव्य हे आंबेजोगाई येथे झाले.
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा