Home>ग्रह शांती – Grah Shanti

ग्रह शांती - Grah Shanti

grah-shant

शनि मंगल योग शांती - Shani Mangal Yog Shanti

शनि मंगल योग शांती :शनि-मंगळ योग शांती हा एक विशेष वैदिक विधी आहे, जो व्यक्तीच्या कुंडलीत शनि आणि मंगळ या दोन ग्रहांमध्ये अशुभ योग निर्माण झाल्यास केला जातो. हा योग सामान्यतः कष्ट, संघर्ष, अपघात, वैवाहिक समस्या किंवा आरोग्यासंबंधी अडचणी निर्माण करतो. त्यामुळे, या योगाचा प्रभाव कमी करण्यासाठी शनि-मंगळ शांती विधीची योजना केली जाते.

चांडाळ योग शांती - Chandal yog Shanti

बृहस्पति आणि राहु एका राशीत किंवा घरामध्ये एकत्र असतात किंवा कुंडलीत एकमेकांशी कोणत्याही प्रकारे संबंधित असतात तेव्हा कुंडलीत चांडाल योग (Chandal yog) तयार होतो. या दोघांच्या संयोगाने गुरु चांडाल योग किंवा चांडाल दोष (chandal dosh) निर्माण होतो, जी कुंडलीत फार मोठी विसंगती मानली जाते. या योगामुळे जीवनात विविध प्रकारच्या सुखसोयींमध्ये आणि जीवनात पुढे जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. या योगाने प्रभावित व्यक्ती खूप भौतिकवादी असते, आणि ती आपल्या जीवनात नकारात्मकतेकडे वाटचाल करतो,त्यामुळे अशा योगाचे निवारण करण्यासाठी शांती विधी केला जातो.

षडग्रहादी शांती - Shadgrahadi Shanti

षडग्रहादी शांती म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सहा ग्रहांचे (षडग्रह) एकत्र अशुभ योग निर्माण झाल्यास, त्यांचे निवारण करण्यासाठी आणि त्यांच्या अनिष्ट प्रभावाला कमी करण्यासाठी करण्यात येणारा विशेष वैदिक विधी होय. हा विधी जीवनात शांती, समृद्धी, आरोग्य, आणि शुभत्व मिळवण्यासाठी केला जातो.

ग्रहणपर्वकाळ योग शांती - Grahanparvakaal Yog Shanti

ग्रहण पर्वकाल हा अतिशय संवेदनशील काल मानला गेला आहे, ग्रहणाच्या वेळी एखाद्या जातकाचा जन्म झालास शुभ व अशुभ अशा परिणामांचा प्रभाव त्याच्या आयुष्यावरती पडतो. या ग्रहण पर्वकालामुळे कुंडलीमध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण होऊ शकतात मानसिक अस्थिरता, सतत नुकसान, आरोग्याच्या समस्या अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते या सर्व समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी ग्रहण पर्वकाल शांत करणे अत्यंत गरजेचे आहे.

ग्रहण योग शांती - Grahan Yog Shanti

ग्रहण या शब्दाचा अर्थ "ग्रहण" असा होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जन्म सूर्य किंवा चंद्रग्रहण दरम्यान होतो तेव्हा असे म्हटले जाते की त्या व्यक्तीला ग्रहण दोष असतो.जेव्हा सूर्य आणि राहू एकाच घरात असतात,सूर्य आणि केतू एकाच घरात असतात, चंद्र आणि राहू एकाच घरात असतात, चंद्र आणि केतू एकाच घरात असतात अशा व्यक्तीच्या जीवनावर मानसिक अस्वस्थता: सूर्यग्रहण योगामुळे प्रभावित झालेल्या व्यक्तींना मानसिक अस्वस्थता, चिंता आणि नैराश्य येऊ शकते. हा दोष दूर करण्यासाठी एक नक्षत्र जनन शांत करणे आवश्यक असते.

नवग्रह शांती - Navgrah Shanti

नवग्रह शांती म्हणजे कुंडलीतील नवग्रहांचे दोष कमी करून जीवनात शांती, समृद्धी, आणि शुभत्व निर्माण करण्यासाठी केलेली विशेष पूजा. नवग्रह म्हणजे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, आणि केतू. या ग्रहांच्या स्थितीमुळे व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.कुंडलीतील ग्रहदोष, अशुभ दशा, किंवा अशुभ गोचरामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर उपाय करण्यासाठी नवग्रह शांती केली जाते.स्वास्थ्य, धन, करियर, विवाह, आणि मानसिक शांततेसाठी नवग्रह दोष दूर करणे महत्त्वाचे आहे.

सूर्य संक्रमण पुण्यकाल शांत - Surya Sankraman Punyakaal Shant

सूर्य संक्रमण पुण्यकाल म्हणजेच सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याचा क्षण हे संक्रमण दर महिन्याला येत असते मेष संक्रांति मकर संक्रांति तुला संक्रांती हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात एखाद्या जातकाचा जन्म या संक्रमण काळात झाल्यास त्याच्या आयुष्यावरती नकारात्मक प्रभाव पडत असतो.त्याचे निराकरण करण्यासाठी ही शांत केली जाते.

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!