विविध नवरात्री - Vividh Navratri

चैत्र नवरात्री पूजन - Chaitra Navratri Pujan
शक्ती उपासनेचा महापर्व आहे नवरात्री. नवरात्रीच्या साधनेमुळे प्रसन्न होऊन देवी आपल्या साधकांवर पूर्ण वर्ष कृपेचा वर्षाव करत असते. चैत्र नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहे. हे उपाय भक्ती - भावाने केल्याने इच्छित फल प्राप्ती होते. नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची पूजा करण्यासोबतच मंत्रोच्चार आणि ध्यान केल्याने नकारात्मकता दूर होते आणि मनाला शांती मिळते.
चैत्र नवरात्री नऊ दिवसांची पूजा – Chaitra Navratri 9 Days Puja
वर्षभरामध्ये येणाऱ्या नवरात्रा पैकी हे एक नवरात्र सगळीकडे प्रचलित आहे.चैत्र नवरात्र म्हणजे वसंत ऋतु मध्ये येणारे हे नवरात्र यासाठी या नवरात्राला वासंतिक नवरात्र किंवा वसंत नवरात्री असेही म्हणण्याची पद्धत आहे . विशेषतः हे नवरात्र उत्तर भारतामध्ये आढळून येते चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हे नवरात्र असते नवमीच्या दिवशी रामनवमी असल्याने या अखंड नवरात्राला राम नवरात्र असेही म्हणण्याची पद्धत प्रचलित आहे.
शारदीय नवरात्र पूजन - Shastriya Navratra Pujan
शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे या दिवसांमध्ये नऊ दिवस श्री दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्री देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात हे नऊ दिवस सर्वात पवित्र मानले जातात नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध नैवेद्य अर्पण केले जातात.
शारदीय नवरात्र नऊ दिवसांची पूजा – Shardiya Navratra 9 Days Puja
शारदीय नवरात्र म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील सर्वाधिक महत्त्वाचा असे हे नवरात्र आहे. या नवरात्रामध्ये देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा प्रचलित आहे. त्याला नवदुर्गा असेही म्हणतात. या नवरात्र मध्ये आपल्या कुलधर्म कुलाचारानुसार घट बसवणे, देवीची एक काल द्विकल व त्रिकाल अशी विशेष पूजा, नैवेद्य समर्पण ललिता पंचमीची पूजा, कुंकूमार्चन, कुमारिका पूजन सुवासिनी पूजन ब्राह्मण भोजन अष्टमी दिवशी सर्वतोपरी इच्छित मनोकामना पूर्ततेसाठी अष्टमी होम तसेच सप्तशती पाठ नवचंडी याग असे विविध उपचार करण्याची पद्धत आपल्याकडे रूढ आहे.
खंडोबा नवरात्री पूजन - Khandoba Navratri Pujan
खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते हा खरा षड्रात्रोत्सव असतो मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडला जातो सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवला जातो देवाला विशेष बेल दवणा, झेंडूची फुले अशी अर्पण केली जाते तसेच विशेष पूजन अर्चन ही केले जाते.
खंडोबा नवरात्री पाच दिवसांची पूजा – Khandoba Navratri 5 Days Puja
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा पासून मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवसापर्यंत खंडोबाचे नवरात्र असते. प्राचीन आख्यायिकेनुसार श्री देव खंडोबा भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी मनी व मल्ल अशा राक्षसांचा वध करून स्वतः लिंग स्वरूपामध्ये प्रकट झाले. ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे असे सर्व भक्तगण खंडोबा नवरात्रामध्ये पाच दिवस उपवास करतात आणि सहाव्या दिवशी उपवास सोडतात. या सहा दिवसांमध्ये खंडोबा च्या समोर अखंड दीप तसेच देवाची विशेष पूजन अर्चन अभिषेक होम हवनादी कर्म केले जाते.
योगेश्वरी नवरात्री पूजन - Yogeshwari Navratri Pujan
योगीनींमध्ये प्रमुख अधिपत्य करणारी देवता ती योगेश्वरी होय. चांगल्यावर वाईटाचा विजय म्हणून दसरा साजरा केलाजातो.महाराष्ट्रात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, सप्तशृंगी ही देवीची मुख्यपीठे आणि अनेक उपपिठे असली तरी अंबेच्या नावाने प्रसिद्ध असलेली अंबाजोगाई हे एकच एक शक्तिपीठ अस्तित्वात आहे. योगीनींमध्ये प्रमुख अधिपत्य करणारी देवता ती योगेश्वरी होय. याप्रमाणे योग साधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणून योगेश्वरी नाव प्रचारात आले असावे, असे मानले जाते.
योगेश्वरी नवरात्री नऊ दिवसांची पूजा – Yogeshwari Navratri 9 Days Puja
योगेश्वरी देवी म्हणजे साक्षात दुर्गा स्वरूप देवी आहे या देवीचा नवरात्र उत्सव काळ म्हणजेच शारदीय नवरात्र व जन्मोत्सव काळ म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष पौर्णिमा हा आहे. योगेश्वरी देवीचे मंदिर महाराष्ट्रातील आंबेजोगाई येथे आहे.. ज्या कुळातील लोकांची कुलस्वामिनी कुलदेवता योगेश्वरी आहे असे सर्वजण देवीचे नवरात्र करतात. या नवरात्री काळामध्ये देवीसाठी विशेष पूजन अर्चन करण्याची पद्धत आहे. योगेश्वरी देवी ही कुमारी का असल्याने या नवरात्र उत्सव काळामध्ये विशेष कुमारिका पूजन देखील केले जाते.
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा