सद्गुरु उपासना
धर्म ग्रंथानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी दत्त महाराजांचा जन्म झाला होता. श्रीदत्तात्रयांचे स्वरूप त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असलेले ब्रह्मा-विष्णू-महेश अशा स्वरूपाचे आहे. सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण, तसेच या गुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्त. निर्मिती-पालन-संहार हे त्यांचे कार्य होय. देव आणि मुनिवर त्यांचे ध्यान करतात. गायत्री मंत्र वा गुरुमंत्राचे स्मरण तसेच श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करून दत्ताची उपासना करता येते. कलियुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच आपल्या वास्तूतील दोष-कलह यांचा परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहीसे होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी आणि विद्या लक्ष्मी प्राप्ती होऊन मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी सद्गुरु उपासना अतिशय महत्त्वाची आहे. यासाठी खाली जे स्तोत्र दिलेले आहे त्याचा अवश्य पठण करावे.
।।श्री गणेशाय नम:।।
अस्य श्रीदत्तात्रेय द्वादशनाम स्तोत्र मंत्रस्य।
परमहंस ऋषि:।श्री दत्तात्रेय परमात्मा देवता।
अनुष्टुप् छंद:।सकल कामना सिद्ध्यर्थे जपे विनियोग:।
प्रथमस्तु महायोगी। द्वितीय प्रभुरीश्वर:।
तृतीयश्च त्रिमूर्तिश्च। चतुर्थो ज्ञानसागर:।
पंचमो ज्ञानविज्ञानम्। षष्ठस्यात् सर्वमंगलम्।
सप्तमो पुंडरीकाक्षो। अष्टमो देववल्लभ:।
नवमो नंददेवेशो। दशमो नंददायक:।
एकादशो महारुद्र:। द्वादशो करुणाकर:।
एतानि द्वादश नामानि दत्तात्रेय महात्मन:।
मंत्रराजेति विख्यातं दत्तात्रेय हर: परा:।
क्षयोपस्मार कुष्ठादि तापज्वर निवारणम्।
राजद्वारेपथे अघोरे संग्रामेषु जलांतरे।
गिरे गृहांतरे अरण्ये व्याघ्र चोर भयादिषु।
आवर्तने सहस्रेषु लभन्ते वांछितं फलम्।
त्रिकालं य: पठेन्नित्यं मोक्षसिद्धिमवाप्नुयात्।
दत्तात्रेय सदा रक्षेत् यश: सत्यं न संशय:।
विद्यार्थी लभते विद्यां रोगी रोगात् प्रमुच्यते।
अपुत्रो लभते पुत्रं दरिद्रि लभते धनम्।
अभार्यो लभते भार्याम् सुखार्थी लभते सुखम्।
मुच्यते सर्व पापेभ्यो सर्वत्र विजयी भवेत्।।
इति श्री दत्तात्रेय द्वादश नाम स्तोत्रम् संपूर्णम्।।
श्री दत्तात्रेयार्पणमस्तु।।

Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा
