Home>Blog>सण व उत्सव>डोहाळे जेवण

डोहाळे जेवण

dohale-jevan

डोहाळे जेवण म्हणजे बाळंतपणाचा सोहळा. हा सोहळा गरोदर महिलेच्या सातव्या महिन्यात करण्याची पद्धत आहे. या सोहळ्याचा विशेष उद्देश आईला आनंदी व उत्साही करणे तसेच तिला गरजेच्या असलेल्या वस्तू देणे व तिच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणे असा आहे. आता हा सोहळा कसा करतात हे पाहूया.

डोहाळे जेवणाचे मुख्य घटक कोणते:-

आईला सजवणे:
आईला सुंदर कपड्यांनी आणि फुलांनी सजवले जाते.

ओटी भरण:
आईला हळद कुंकू लावून साडी गजरा आणि सौभाग्य वाण याने ओटी भरली जाते.

जेवण:
आईला आवडीचे खाद्यपदार्थ दिले जातात.

गाणी आणि खेळ:
महिलांसोबत गाणी गाऊन आणि खेळ खेळून आनंद साजरा केला जातो.

माहेरचे लोक:
विशेष करून या सोहळ्यात आईच्या माहेरातील लोकांना सहभागी करून घेतले जाते. आपल्याला प्रश्न पडेल की डोहाळे जेवण म्हणजे नक्की काय?डोहाळे लागतात म्हणजे नक्की काय होतं? तर महिलेच्या गर्भात साधारण पाचव्या महिन्यात बाळाची स्पंदने जाणवू लागतात. या बाळाच्या काही इच्छा असतात, त्यानुसार आईला वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खावेसे वाटू लागतात. त्यालाच डोहाळे लागणे असे म्हटले जाते. साधारण सातव्या महिन्यात बाळाची वाढ पूर्ण झालेली असते आणि त्यावेळी बाळाला अधिक अन्न लागते. त्यामुळेच महिलेसाठी डोहाळे जेवण आयोजित करण्यात येते आणि बाळाचे चोचले आणि त्या अनुषंगाने महिलेचे डोहाळे यावेळी पुरविण्यात येतात.

गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यानंतर, चोरओटी ही एक खास पारंपरिक कृती पार पाडली जाते. त्यानंतर सातव्या महिन्यात, रूढी आणि परंपरेनुसार, सर्व नातेवाईक आणि आप्तेष्ट एकत्र येऊन ‘ओटीभरणे’ किंवा ‘डोहाळे जेवण’ हा सोहळा साजरा करतात. या कार्यक्रमामध्ये भावी मातेला आशीर्वाद, उपहार आणि पारंपरिक खाद्यपदार्थ दिले जातात.

आता आपण डोहाळे जेवण करण्याचे वैज्ञानिक कारण पाहूया :-

पूर्वी महिलांना आराम मिळत नसे. डोहाळे जेवण करण्याचा कालावधी सातव्या महिन्यात असतो त्यानंतर त्या महिलेला संपूर्ण विश्रांतीची गरज असते. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने नुसार सातव्या महिन्यात डोहाळे जेवण झाल्यावर महिलेला माहेरी पाठवण्याची प्रथा होती. आताही ती चालू आहे. पूर्वीच्या काळी आर्थिक क्षमता कमी अधिक प्रमाणात असल्याने महिलांना हवे तितके खायला मिळत नसेल त्यामुळे त्यांचे डोहाळे पुरविण्याची आणि त्यांना हवं नको ते पाहण्याची ही प्रथा सुरु झाली असू शकते.याशिवाय सातव्या महिन्यात बाळाच्या जीवाला धोका पोहोचण्याची संभावना असते. त्यामुळे बाळाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी हा डोहाळे जेवणाचा विधी करण्यात येत असे. काही ठिकाणी यावेळी विशेष पूजाअर्चाही केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया बाळाच्या आरोग्यासाठी करण्यात येते. या विधीनंतर गर्भवती महिलेला आपल्या माहेरी पाठवण्यात येते जेणेकरून तिच्या शरीराला विश्रांती मिळून आई आणि बाळ या दोघांचेही आरोग्य उत्तम राहील.

डोहाळे जेवणाचा विधी नक्की काय असतो?

साधारणतः आपल्याला डोहाळे जेवणाला केलेली सजावट आणि फुलांच्या बाणाने सजलेली महिला अथवा चंद्रावर आपल्या पतीसह बसलेली महिला याबाबत माहिती असते. पण नक्की हा काय विधी असतो जाणून घेऊया.
सातव्या महिन्यात महिलेचा ओटी भरण्याचा कार्यक्रम म्हणजे डोहाळे जेवण. काही वेळेस आपण बघतो की आपल्या सोयीनुसार हा विधी संध्याकाळी सुद्धा करण्यात येतो.मात्र डोहाळे जेवण ज्या दिवशी करायचे आहे त्या दिवशी पंचांगानुसार मुहूर्त बघितला जातो. गर्भवती महिलेच्या आनंदासाठी फुलांची सजावट करण्यात येते. बाळ जन्माला येण्याआधी सातव्या महिन्यात घरातील आणि आलेल्या पै पाहुण्यांपैकी सुहासिनी या सदर महिलेची ओटी भरतात. हिरवी साडी, फुलांचा गजरा, हिरव्या बांगड्या आणि पाच फळे ही ओटी महिलेची सासू भरते.

आत्ताच्या पिढीला ओटी भरत असताना त्यामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात याबद्दल संभ्रम आहे त्याबाबत आपण माहिती घेऊया.

हिरवी साडी , ब्लाऊज पिस, तांदूळ, नारळ, सुपारी, हळकुंड, खारीक आणि बदाम, सुवासिक फुलांचा गजरा,
वेगवेगळ्या प्रकारची पाच फळे, आधुनिक पद्धतीनुसार गर्भवती महिलेच्या आवडीचे गिफ्ट्स.

सध्या डोहाळे जेवणाला एक इव्हेंटचे रूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे तुम्ही यापैकी ओटी भरण्याची पद्धती निवडून ओटीभरण्याचा कार्यक्रम करू शकता.

झोपाळ्यावरील ओटी भरणी – झोपाळा फुलांनी सजवून त्यावर बसवून गर्भवती महिलेची ओटी भरली जाते. झोपाळ्यावर झुलल्यानंतर ज्याप्रमाणे आनंद मिळतो तसाच आनंद बाळाच्या येण्याने कायम आयुष्यात दरवळत राहो अशीच यामागे मनोकामना देत ओटीभरणी केली जाते.

धनुष्यबाणाची ओटी भरणी – पूर्वी जशी धनुष्यबाणातून अप्रतिम वातावरण निर्मिती करण्यात यायची, त्याप्रमाणे बाळाच्या येण्याने सर्व काही चांगले होईल या मनोकामनेतून ही धनुष्यबाणाची ओटी भरणी करण्यात येते. आजकाल नव्या पद्धतीने धनुष्यबाण घेऊन नवरा आणि बायको कायमस्वरूपी आठवणी फोटोद्वारे जपण्याचा प्रयत्न करतात.

काही जणांना फार गर्दी आवडत नसल्याकारणाने हा कार्यक्रम घरातल्या माणसांच्या उपस्थितीत मंदिरामध्ये सुद्धा करतात.

चांदण्यातील ओटी भरणी – चंद्र आकृती तयार करून त्यावर फुलांच्या माळा सोडून तिथे गर्भवती महिलेला बसवले जाते व त्या आकृती बरोबर तिचे विविध फोटो काढले जातात आणि तिथेच बसून तीची ओटी भरण्याचा कार्यक्रम करण्यात येतो. तिचे हे गर्भावस्थेतील दिवस अत्यंत शीतल जावेत अशी मनोकामना यामागे असते.

बागेतील ओटी भरणी – हल्ली डोहाळे जेवण आधुनिक पद्धतीनेही केले जाते, ज्याला Baby Shower असे म्हटले जाते. पारंपरिक न करता केक मागवून अथवा पार्टी स्वरूपात हा कार्यक्रम करण्यात येतो.

आता आपण विशेष करून डोहाळे जेवणासाठी महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार कोणता स्वयंपाक केला जातो ते पाहूया.

बटाटा भाजी | भरले वांगे | भरली तोंडली
वाटाणा-बटाटा रस्सा | मुगाची उसळ
मिक्स भजी (कांदा-बटाटा) | कोथिंबीर वडी | अळूवडी | पोळी / पुरी / फुलका
वरण-भात / मसालेभात / पुलाव | कढी / टॉमेटो सार | खोबऱ्याची ओली चटणी
काकडी-टॉमेटो रायता | पापड | लोणचं
गुलाबजाम,पुरणपोळी, खीर, बासुंदी, श्रीखंड.

वरीलपैकी कोणताही मेनू तुम्ही तुमच्या पद्धतीने नुसार बनवू शकता. सहसा महाराष्ट्रातील लोक जेवणासाठी वरील पदार्थ करतात. पण हल्ली पंजाबी, बंगाली, दाक्षिणात्य आणि चायनीज पदार्थांचाही समावेश करण्यात येतो.

डोहाळे जेवणासाठी काही विशिष्ट वेगळे विधी असतात का? भटजी बोलवावे लागतात का?

तर याचे उत्तर आहे हो. आपल्या हिंदू धर्मामध्ये षोडश संस्कार सांगितलेले आहे त्यापैकी गर्भाधान हा पहिला संस्कार आहे आणि ह्या संस्कारापासून बाळ जन्माला येईपर्यंतचे जे संस्कार आहेत ते केले नसल्यास सातव्या महिन्यामध्ये हे संस्कार करण्याची पद्धत आहे. त्यामध्ये काही विधी केले जातात. पुण्याहवाचन मुख्य देवता स्थापन हवंनाचा विधी आणि विशेष गर्भवती महिलेचा सत्कार समारंभ आणि औक्षण इत्यादी करण्यात येते..

आता या डोहाळे जेवणासाठी काही विशेष आणि गाणी प्रचलित आहे ती आपण पाहूया.

डोहाळे गीत

1} डोहाळे तव पुरी भगिनी, काय आवडे सांगावे मनी गजानना आधी नमुनि, ओटी भरली पाच फळांनी डोहाळे तव पुखवी भगिनी।११।। झोपाळ्यावरी बसवृनि तिजला, केशर लावृनि दो हस्ताला चोळी हिखी, शालू नेसवुनि, पुखी भगिनी[१२। चांद पाहुनि पौर्णिमिचा, .गजरा घालुनि जाईजुईचा मांडे धेऊनि ब्सल्या भोजनी, पुखी भगिनी॥३ ।l भगिनीसुत दीर्ायु होवो, पूर्वजांची तव कीतीं वाढवो हीच विनंती प्रभुच्या चरणी, पुरी भगिनी।। ४ ।l

2} होत असे काय गे तुजला, पुसतसे जननी दुहितेला, म्लना हे मुख तव झाले, डोळे बघ खोल किती गेले, गालावरी लाली नाही, पांढरे ओठ किती बाई |मिशी दिनी का निजू निजू करीशी, भोजनास का नच उठसी , समजू तरी काही समजू तरी काही जीव माझा भिऊनि जाई | जडपणा अंगी संचरला,आळस हा अतिशय आला, समजली माऊली तिची, गर्भाची चिन्हे दिसती, नातू होणार नातू होणार, हर्षा नच पारावार,द्राक्षे ही सुंदर आणिली, आंब्याने परडी भरली, यातील रुचक न बाळे, खा तर मग पेरू केळे, लाग खायाला ,लाग खायाला, डाळिंब आणायला गेला,यातील रुचत ना काही, चिवडा तरी करते बाई, भजी केली घोसाळ्याची, कोशिंबीर कशी कांद्याची, वांगी भात ऊन ऊन केला, बासुंदी पुरी जोडीला, वाटी चांदीची, वाटी चांदीची ,भरली बघ श्रीखंडाची,नऊ दिवस वरती जाता, पुत्र रत्न प्रसवे दुहिता, माय बापाला , माय बापाला, आनंद गणगोताला ||

3} संखे काय होती मनी भावना, तुला काय सुखवे ते बोल ||
श्रीशारदेच्या मनी मानसी ,क्रीडा करावयासी का वांछीसी
रुचे काय वेणू सुधा सेवना, सखे काय होती मनी भावना। । नभातुन त्या तारंका सुंदरी, तुला पाहुनि तोषल्या अंतरी हसे जैशी कौतुके ती पौर्णिमा, सखे काय… ॥२॥ बागेमध्ये रातराणी फुले, निशिगंध, चाफा, चमेली डुले मधुगंध मोही तयांचा मना, सखे काय..1३॥ ज्योत्स्ने मध्ये या तू मोती दिसे, सृष्टी वरी शांतता नांदते अशा शांत वेळी गडे .बोलेना, सखे काय…I1४ ॥ वैभववासी नेई ही हिंद भू, अशा सुपुत्राची दे देवा प्रभू प्रभूच्या पदी एक प्रार्थना सखे काय..114॥


डोहाळेजेवणासाठी पुरोहित निश्चित करण्यासाठी इथे क्लिक करा

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!