प्रसिद्ध पूजा - Prasiddha Puja
गणेश स्थापना म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणारी प्राणप्रतिष्ठा. हा एक विशेष विधी आहे. या उत्सवाची सुरुवात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला व माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला होते. गणपतीची स्थापना शुभ मुहूर्तावर केली जाते आणि हा उत्सव १.५, ५, ७, किंवा १० दिवसांसाठी साजरा केला जातो. आणखी वाचा…
सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची उपासना करण्याचा एक अत्यंत पवित्र विधी आहे. ही पूजा प्रामुख्याने कुटुंबातील सुख-समृद्धी, शांती, आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी केली जाते. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी किंवा जीवनातील एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगानंतर सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. आणखी वाचा…
कलीयुगामध्ये जीवनातील विविध अडचणी, वास्तुदोष, आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी, वाद-कलह यांवर मात करून शांती, समृद्धी आणि मनःशांती मिळविण्यासाठी रुद्राभिषेक हे एक अत्यंत प्रभावी अनुष्ठान आहे.रुद्र एकादशिनी अभिषेक :- (रुद्र -एकादशिनी ) – ११ आवर्तने, लघुरुद्र अभिषेक :- (लघुरुद्र ) -१२१ आवर्तने, महारुद्र अभिषेक:- (महारुद्र) – १३३१ आवर्तने, अतिरुद्र अभिषेक :- (अतीरुद्र) – १४६४१आवर्तने. अशा प्रकारात आवर्तने करायची पद्धत प्रचलित आहे. आणखी वाचा…
मंगळागौरी पूजा हे व्रत नवविवाहित स्त्रिया पहिली ५ वर्षे श्रावणातील प्रत्येक मंगळवारी करतात. साधारणपणे हिंदू स्त्रिया(अविवाहित किंवा विवाहित) दोघेही भगवान शिव आणि देवी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी उपवास करतात. भगवान शिवासारखा प्रेमळ आणि काळजी घेणारा नवरा मिळावा म्हणून केवळ विवाहित महिलाच नाही तर तरुण मुलीही हे व्रत करतात. या पूजेमुळे सौभाग्य, सुख-समृद्धी, दीर्घायुष्य, व पतीचे आरोग्य लाभते असे मानले जाते. आणखी वाचा…
वास्तु तयार करताना आणि तिचे बांधकाम करताना नैसर्गिक घटक नष्ट होतात किंवा बाधित होतात तसेच खोदकाम, मोठ्या दगडांची तोडफोड, झाडांची कापणी, असंख्य प्राणी, जीव, जंतु,मुंग्या, पक्षांची घरटी या सगळ्यांचा नाश केलेला असतो.या विधीमुळे वास्तुतील दोष, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा व शांती प्रस्थापित होते. तसेच, कुटुंबाच्या समृद्धी, सुख-शांती, आणि आरोग्यासाठीही ही पूजा महत्त्वाची आहे. आणखी वाचा…

Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा
