Home>Blog>आरती>श्रीसत्यनारायणाची आरती

श्रीसत्यनारायणाची आरती

satyanarayanachi-aarti

|| श्री सत्यनारायण भगवान की जय ||

जयजयदीनदयाळा सत्यनारायण देवा ॥
पंचारतिओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥ध्रु० ॥
विधियुक्त पूजुनि करिती पुराणश्रवण ॥
परिमलद्रव्यासहित पुष्पमाळाअर्पून ॥
घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥ प्रसाद
भक्षण करितां तूं त्यांस प्रसन्न नारायण ॥जय०॥१॥
शतानंदे विप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें ॥ दरिद्र दवडुनि अंतीं
त्यातें मोक्षपदानेंलें ॥
त्यापासुनि हें व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें ॥
भावार्थें पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥जय०॥२ ॥
साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें ॥ इच्छित पुरतां
मदाधं होऊनि व्रत न आचरिलें ॥ त्या पापानें संकटीं
पडुनि दुःखहि भोगिलें ॥ स्मृति होऊनि आचरितां व्रत त्या
त्वां हि उद्धरिलें ॥जय०॥३॥
प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली ॥ क्षोभ
तुझा होतांच तिच्या नौका बुडाली ॥
अंगध्वज राजासी यापरि दुःख स्थिति आली ॥
मृत वार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णीं परिसिली ॥ जय०॥४॥
पुनरपि पुजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं ॥
पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥
अंगध्वज राजासी पुत्र भेटति येउनि ॥ ऐसा भक्त संकंटिं
पावसि तूं चक्रपाणी ॥जय०॥५ ॥
अनन्यभावें पुजुनि हें व्रत जे जन आचरती ॥ इच्छित
पुरविशि त्यांतें देउनि संतति संपत्ति ॥ संहरसि भंवदुरितें
सर्वहि बंधने तुटती ॥ राजा रंका
समान मानुनि पावसि श्रीपती ॥जय०॥६ ॥
ऐसा तव व्रत महिमा अपार वर्णूं मी कैसा ।
भक्तिपुरःसर आचरती त्यां पावसि जगदीशा । भक्तांचा
कनवाळू कल्पद्रुमतूं सर्वेशा ॥ मोरेश्वरसुत
वासुदेवत तुज विनवी भवनाशा ॥जयजय०॥ ७॥

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    आणखी वाचा
    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!