Home>सामान्य शांती – Shanti

सामान्य शांती - Shanti

samanya-shanti

उदक शांती - Udak Shanti

उदक शांती म्हणजे कुटुंबातील किंवा व्यक्तीच्या जीवनात शांती, आरोग्य, समृद्धी आणि दोष निवारणासाठी केली जाणारी वैदिक पूजा आहे. या पूजेत पवित्र पाण्याचा (उदक) उपयोग करून विविध देवता, ग्रह, आणि निसर्ग शक्तींचे आह्वान केले जाते. उदक शांती प्रामुख्याने ग्रहदोष निवारण, वास्तुदोष निवारण, आणि नवीन सुरुवातीसाठी केली जाते.नवीन घरात रहायला जायचे असल्यास आपण वास्तुशांती करून रहायला जातो पण जर मुहूर्त नसेल तर उदक शांती करून शुध्दीकरण झाल्यावर आपण रहायला जाउ शकतो.

त्रिकप्रसव शांती - Trikprasav Shanti

त्रिकप्रसव शांती हा विशेष धार्मिक विधी आहे, जो तीन मुलांनंतर मुलगी किंवा तीन मुलींनंतर मुलगा झाल्यास केला जातो. या पूजेचा उद्देश अशा प्रसंगी निर्माण होणाऱ्या अनिष्ट दोषांचे निवारण करणे आणि त्या जातकासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आणि सुख-समृद्धी प्राप्त करणे आहे.

विनायक शांती - Vinayak Shanti

परिवारात किंवा कुटुंबात कुणाचा मृत्यू झालेला असेल,आणि घरात मांगलिक कार्य जसे कि विवाह वैगेरे असेल तर,ते निर्विघ्नं पणे पार पडावे यासाठी विनायक शांती करण्याचे विधान शास्रात दिलेले आहे. शुभ दिवस आणि अग्नी वास बघून आपल्या घरात हि शांती करावी.

यमल योग शांती - Yamal Yog Shanti

यमल जनन शांती हा एक विशेष धार्मिक विधी आहे, मातेच्या उदरात जुळ्या बालकांचा जन्म होतो त्यासाठी हा विधी बालकांचे व मातेचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी तसेच नवजात बालकांना आरोग्यपूर्ण व दीर्घायुष्य मिळण्यासाठी, जन्मकुंडलीतील कोणत्याही दोषाचा नाश करण्यासाठी.त्यांच्या आयुष्याला शुभाशीर्वाद प्राप्त व्हावेत यासाठी केला जातो.

कालसर्प योग शांती - Kaalsarp Yog Shanti

कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत आढळणारा कालसर्प हा अत्यंत क्लेशकारक योग आहे. काल सर्प योगाने प्रभावित झालेल्या व्यक्तीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही कोणत्याही व्यक्तीला मध्यम स्थितीत ठेवत नाही. काल सर्प योगामुळे, एकतर व्यक्ती त्याच्या आयुष्यात मोठी उंची गाठतो आणि त्याला सर्व सुख, कीर्ती, आदर इत्यादी मिळतात अन्यथा हा योग त्याला खालच्या पातळीवर नेतो.

अधोमुख जनन शांती - Adhomukh Janan Shanti

अधोमुख जनन शांती हा एक ज्योतिषीय विधी आहे जो व्यक्तीच्या जीवनातील अडचणी, खासकरून जन्माच्या संकटकाळी किंवा अनिष्ट गोष्टींचा निवारण करण्यासाठी केला जातो. "अधोमुख" म्हणजे खाली किंवा निचले मुख असलेले, आणि "जनन" म्हणजे जन्म. या संदर्भात, ही शांती विधी जन्माच्या काळातील अशुभ ग्रहांची स्थिती किंवा शरीराच्या अवयवांचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी केली जाते. हे विशेषतः त्या व्यक्तीला फायदेशीर ठरते ज्यांच्या जीवनात जन्माच्या बाबतीत किंवा प्रजनन संबंधित अडचणी आलेल्या असतात.

पितृदोष जनन शांती - Pitrudosh Janan Shanti

पितृदोष जनन शांती म्हणजे त्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत पितृदोष असल्यास, पूर्वजांच्या आत्म्यांना शांत करण्यासाठी आणि त्याच्या जीवनात सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी विशेष उपाय केले जातात. पितृदोषामुळे व्यक्तीच्या जीवनात आर्थिक अडचण, मानसिक ताण, वैवाहिक समस्यांपासून जीवनातील अन्य समस्या उद्भवू शकतात.

भुवनेश्वरी शांती - Bhuvneshwari Shanti

ऋतूशांती (भुवनेश्वरी शांती) हा एक महत्त्वाचा ज्योतिषीय विधी आहे, जो अशुभ काळात रजोदर्शन झाल्यानंतर गर्भाधानापूर्वी केला जातो. रजोदर्शनाच्या वेळी जर अशुभ ग्रहांचा प्रभाव असतो, तर त्याला ऋतूशांती किंवा भुवनेश्वरी शांती विधीने निवारण केले जाते. या विधीचा मुख्य उद्देश्य गर्भाधानासाठी योग्य वातावरण तयार करणे आणि त्याच्या अशुभ प्रभावापासून बचाव करणे आहे.

बृहस्पती शांती - Bruhspati Shanti

बृहस्पती शांती हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण ज्योतिषीय विधी आहे, जो बृहस्पती ग्रहाच्या अशुभ प्रभावांपासून मुक्तता मिळवण्यासाठी केला जातो. बृहस्पती ग्रह ज्योतिषशास्त्रात गुरू म्हणून ओळखला जातो आणि तो ज्ञान, सन्मार्ग, शांती, समृद्धी, वाचन, अध्यात्म आणि विवाहाचे कारक मानला जातो. बृहस्पती ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन सुखी, समृद्ध आणि शांतीपूर्ण होऊ शकते, परंतु जेव्हा बृहस्पती ग्रह कुंडलीत अशुभ स्थितीत असतो, तेव्हा त्याचा नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडू शकतो.

दीप पतन शांती - Deep Patan Shanti

दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला, तर त्यासाठी दीपपतन नावाची शांत करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा पडला, त्याच ठिकाणी ती शांत करावी, असे सांगितले जाते.देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला, तर तो अशुभ संकेत मानला जातो.

पौष प्रसूती शांती - Poush Prasuti Shanti

पौष प्रसूती शांती पौष महिन्यात जन्म झालेल्या बाळाच्या कुंडलीतील दोष निवारणासाठी आणि आई व बाळाच्या आरोग्यसाठी केली जाते. या शांतीमुळे आयुष्यात शुभ परिणाम, सुख-समृद्धी, आणि सौख्य प्राप्त होते.

प्रपौत्र मुखदर्शन शांती - Prapoutra Mukhdarshan Shanti

प्रपौत्र मुखदर्शन शांती म्हणजे प्रपौत्राच्या (पडवंडाच्या) जन्मानंतर त्या कुटुंबासाठी शुभत्व आणि संततीच्या उत्तम आरोग्यासाठी, नवीन पिढीचे जीवन शुभ, आनंददायी, आणि सुखकर होण्यासाठी.दीर्घायुष्य आणि समृद्धीसाठी केली जाणारी विशेष पूजा आणि धार्मिक विधी.

राहू जनन शांती - Rahu Janan Shanti

राहू शांत म्हणजे राहू हा ग्रह छायाग्रह म्हणून मानला गेला आहे. राहू हा ग्रह अज्ञात संकटे, कर्म, मानसिक अस्थिरता भ्रम आणि अचानक बदल यांचे प्रतिनिधित्व करतो. राहूच्या प्रभावामुळे जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या मानसिक तणाव, व्यसनाधीनता, नोकरी व्यवसायातील अडथळे तसेच कोर्ट कचेरीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. या सर्व दोषांचा परिहार होण्यासाठी तसेच राहू ग्रह शुभ फल देण्यासाठी राहूची विशेष जप होम हवन आधी प्रकारात शांती केली जाते.

सर्वारिष्ठ शांती - Sarvaristh Shanti

सर्वारिष्ठ शांती हा विधी त्यांना दिला जातो ज्यांच्या जीवनात कोणत्या तरी गंभीर अडचणी किंवा विघ्नांचा सामना करावा लागतो. या शांतीने व्यक्तीच्या जीवनातील संकटं, दुःख, आणि अडचणी दूर होतात, तसेच व्यक्तीला शांती, समृद्धी आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होते.

दग्ध योग शांत - Dagdh Yog Shant

हा एक असा योग आहे की यामध्ये सगळी शुभ करणे निष्फळ ठरतात या योगा वरती गृहप्रवेश, विवाह संस्कार, नवीन व्यवसाय प्रारंभ ,यज्ञयाग असतील तर या योगा वरती शक्यतो टाळल्या जातात. या योगामुळे जीवनामध्ये अडथळे अपयश येऊ शकतात म्हणून दोष निवारण करण्यासाठी दग्ध योग शांत केली जाते.

यमघंट शांत - Yamghant Shant

जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मवेळी यमघंट योग असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत अपघात, नुकसान मानसिक, आर्थिक अस्थिरता, अनिष्ट स्वप्ने, भीती वाटणे आणि जीवनामध्ये अपयश इत्यादी संकटे येऊ शकतात त्यासाठी यमघंटा शांत केल्याने या सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि जीवन सुखकर होण्यास मदत होते.

मृत्यू योग शांत - Mrutyu Yog Shant

मृत्यू योग हा अत्यंत अशुभ मानला जातो. जर कुंडलीत मारकेश ग्रह (शनी, राहू, केतू, मंगळ) बलवान असतील आणि शुभ ग्रह निर्बल असतील.मृत्यू योग असलेल्या व्यक्तीला गंभीर आजार, अपघात किंवा अचानक संकटांना सामोरे जावे लागते.कुंडली मधील अष्टमस्थानात अशुभ ग्रहांचा प्रभाव असेल तर असा योग तयार होतो.ही शांत केल्याने अकाली मृत्यू आयुष्यातील संकटे अडचणी तसेच शारीरिक मानसिक आरोग्य सुधारते.

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!
    काय मदत हवी आहे ?
    नमस्कार,

    आम्ही आपली काय मदत करू शकतो ?

    -नमो गुरुजी