Home>Blog>सण व उत्सव>हनुमान जयंती विशेष

हनुमान जयंती विशेष

hanuman-jayanti

श्रीराम भक्त हनुमान! पवनसुत हनुमान!! संकटमोचन हनुमान!!! आणि चिरंजीवी हनुमान.श्री पवनसुत हनुमान हे श्रीरामांचे निस्सिम भक्त! श्री हनुमान चिरंजीवी आहेत. सप्तचिरंजीवांमध्ये यांचा समावेश होतो.  ज्या वेळेला श्री रामभक्तांवरती कोणतेही संकट येईल त्यावेळी संकट निवारण करण्यासाठी हनुमान स्वतः धावून येतील असे वचन हनुमानाने श्रीरामांना दिल्याचे आपल्याकडे सांगितले जाते. संपूर्ण आयुष्यात आर्थिक, मानसिक, शारीरिक कोणतीही अडचण अथवा संकटे आल्यास श्री हनुमंताचा धावा केल्याने तत्काळ दुःख निवारण होते.हनुमान जयंतीचा उत्सव हनुमान भक्त किंवा राम भक्त या दोघांसाठी जणू काही महापर्वणीच असते. देशभरातील लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. राम नवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रामजन्मोत्सवाचा उत्साह ठिकठिकाणी दिसतोच. राम नवमीनंतर हनुमान जयंतीही तितकीच खास असते. उत्तर भारतात चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये  तसेच तामिळनाडूमध्ये मार्गशीर्ष अमावस्येला हनुमान जयंती साजरी केली जाते. कर्नाटकात मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला हनुमान जयंती साजरी केली जाते.

परंतु या दोघांमध्ये काय फरक आहे किंवा काय योग्य अयोग्य आहे याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यासाठी आपण थोडक्यात माहिती घेऊया. हनुमान जयंतीला जन्मोत्सव म्हणणे हेच योग्य ठरेल असे काही तज्ज्ञांचे मत आहे. जयंती आणि जन्मोत्सव म्हणजे काय तर थोडक्यात वाढदिवस होय. पण शास्त्रानुसार जयंती ही अशा व्यक्तींसाठी वापरली जाते जी व्यक्ती आज हयात नाहीये. पण ज्यावेळी श्री हनुमंत यांचा विचार केला जातो त्यावेळी कलियुगातील जिवंत किंवा जागृत देवता म्हणून पाहिले जाते. यासाठी एक प्राचीन पौराणिक कथा सुद्धा प्रचलित आहे.

पौराणिक कथा

 हनुमान सफरचंद समजून सूर्यालाच गिळंकृत करण्यासाठी झेपावला होता तेव्हा सर्व देव घाबरले आणि ते इंद्रदेवाकडे गेले. त्यावेळी इंद्रदेवाने आपल्या वज्राचा प्रहार करून हनुमानाला मूर्च्छित पाडले. हे सगळं पाहता वायू देव संतापले व त्यांनी संपूर्ण पृथ्वीवरून आपलं अस्तित्व संपवण्याचा निर्णय घेतला. सर्व पशु-पक्षी हवे अभावी मरण पावतील याचा विचार करून सर्व देव घाबरले आणि ते तात्काळ वायुदेवाचा क्रोध शांत व्हावा यासाठी ब्रह्मदेवाकडे गेले तेव्हा ब्रह्मदेव स्वतः प्रकट होऊन त्यांनी सांगितले की ब्रह्मदेवाचे ब्रम्हास्त्र श्रीविष्णूंचे सुदर्शन चक्र आणि शंकराचे त्रिशूल अशा कोणत्याही अस्त्रांचा श्री मारुतीरायावर परिणाम होणार नाही. या दंतकथेनुसार श्री इंद्रदेवाने मारुतीरायाला जबडा असलेला म्हणजेच हनुमान असे नाव ठेवले. आपण पाहतो की रामायणात सुद्धा हनुमानाच्या असीम भक्तीने प्रसन्न होऊन खुद्द श्रीरामाने हनुमंताला चिरंजीव भव असा वर दिलेला आहे.या सगळ्या वरून अभ्यासकांचं असं मत आहे की हनुमान जयंती नव्हे तर हनुमान जन्मोत्सव असंच म्हणणं उचित ठरेल.

एका जुन्या पोथीनुसार कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी या तिथीला श्री मारुतीरायांचा जन्म झाला होता असा उल्लेख आढळतो त्यामुळे काही ठिकाणी हा दिवस सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

विशेष पूजा

या चिरंजीवी हनुमंताच्या आशीर्वादासाठी आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी तसेच आपली शारीरिक, आर्थिक व मानसिक संकटे दूर करण्यासाठी काही विशेष पूजा केल्या जातात. त्यामध्ये हनुमंत याग, लघु रुद्र अभिषेक किंवा हनुमान चालीसा पाठ, बजरंग बाण पाठ अशा बऱ्याच प्रकारे आपण पूजा करू शकता आणि मारुतीरायाचे आशीर्वाद प्राप्त करू शकता.

यासाठी नमो गुरुजी मार्फत अगदी शास्त्रोक्त मार्गदर्शन केले जाते.  महाराष्ट्रात सामान्यपणे शनिवार आणि उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीरायाच्या पूजेचे वार मानले जातात. त्या दिवशी मारुतीला शेंदूर लेपण, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची सुद्धा प्रथा आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रात सतराव्या शतकात स्वराज्य स्थापनेसाठी हनुमानाची उपासना ही संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवली आणि त्यासाठी 11 मारुतीची मंदिरे विविध ठिकाणी बांधली आणि बलाच्या उपासनेचे किती महत्त्व आहे हे पटवून दिले. श्री रामदास स्वामी यांनी स्वतः रचलेले भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र महाराष्ट्रात उपासना करताना घरोघरी म्हंटले जाते.

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.


गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    इतर मुहूर्त
    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!
    काय मदत हवी आहे ?
    नमस्कार,

    आम्ही आपली काय मदत करू शकतो ?

    -नमो गुरुजी