मंगळागौरीच्या आरत्या
मंगळागौरीची आरती १
चल चल सखे पुजना ।
हस्ताशी जोडोनी, गौरीसी वंदुनि ॥ धृ. ॥
प्रथम वाहू हळदी कुंकुम हे ।
हाती घेऊ पुष्प सुगंधी हे ।
वाहुनी अक्षदा लावूनी कर्पूरा ॥ १ ॥
चांदीच्या ताटात लावा आरतीला ।
ओवाळू पंचारति तिजला ।
वर्षाशी येऊनी दर्शन देऊनी सर्वकरी मंगला ॥ २ ॥
सौभाग्य लाभो सदा सर्वदा ।
लयास जावो सर्वही आपदा ।
गाऊनी हे गान मागू चुडेदान ॥ ३ ॥
निरांजने आता लावा तुम्ही ।
एकाग्र मनासी ठेवा जणी ।
लावून कर्पूर दावूनी नैवद्य ॥ ४ ॥
मंगळागौरीची आरती २
जय देवी मंगळागौरी ।
सुवासिन मी तुला पुजिते ॥ धृ. ॥
कुंकुमतिलक माझ्या लल्लाटी ।
मंगलमणी दे शोभत कंठी ॥
रत्नपाचुचा चुडा मनगटी ।
स्त्रीजन्माचे अहेव लेणे ॥
तुझ्या कृपेने मला लाभले ॥ १ ॥
शिवशंकराहूनी प्रेमळ भोळा ।
दिधलासी पति तू भाग्यवतीला ॥
देहाच्या देवारी पुजीन त्याला ।
हृदयाची आरती प्राणांच्या ज्योती ॥
अमृत तेजाळ प्रित जळते ॥ २ ॥
मंगळागौरीची आरती ३
मागू शाश्वत सौभाग्याप्रति गौरीला ।
उजळू पंचारती तुजला ॥ धृ. ॥
जमू सगळ्याजणी एक स्थळी ।
सात्विक वृत्ती आणुनी चित्ती ।
आसन करु स्थित, मागू ॥ १ ॥
श्रावण मंगळवारी हिला ।
घालू स्नाने भरजरी वस्त्रे ।
कंचुक मौक्तिक मागू ॥ २ ॥
नेत्री अंजन घालू आधी कंठी भूषण हाती कंकण ।
नासी नथ मग, मागू ॥ ३ ॥
पंचामृती ते पूजन करू ।
कुंकुम अबिरा शेंदुर बुक्का ।
वाहू अक्षता, मागू ॥ ४ ॥
षोडस परीची पत्री आणू ।
खाज्या करंज्या जिलब्या ताज्या ।
नैवेद्याप्रती, मागू ॥ ५ ॥
जन्मांतरीचे दुःख हरी ।
जाऊ शरणा दृढ धरी चरणा ॥
कृष्णे समवेत, मागू ॥ ६ ॥
मंगळागौरीची आरती ४
ओवाळू आरतीला मंगळागौरी तुजला ।
सौभाग्या देई आम्हा हीच विनंती तुला ॥ धृ. ॥
श्रावण मंगळवारी जमु सगळ्या आम्ही नारी ॥
अर्पूवसन जरतारी तुजला बहुत प्रकारी ।
माला या सुमनांच्या अर्पूनी पुजनाला ॥ १ ॥
षोडस परीची पत्री ठेवुनी या सत्पात्री ।
आनंदे आम्ही युवती वाहू तुज अति प्रिती ।
स्विकारी पुजेला वंदीत तव चरणा ॥ २ ॥
वंदन करितो तुजला भक्तीने आम्ही बाला ।
दावीन सन्मार्गाला यास्तव नमु चरणाला ।
अज्ञानी आम्ही बाला तारिया सकला ॥ ३ ॥
प्रार्थी सुशी तभया ही चीर सौभाग्या देई ।
मागत नच तव काहीं ह्यावीण अंबाबाई प्रेमाने परिसावे
हीच विनंती तुला ॥ ४ ॥

Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा
