प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचे महत्त्व व फायदे
श्री प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे श्री सरस्वती देवीचे स्तोत्र आहे.हे स्तोत्र स्कंद पुराणातील कार्तिकेय महात्म्य या भागात आढळते, याचे ऋषी सनत्कुमार आणि देवता स्वामी कार्तिकेय आहेत.विद्या आणि बुद्धी मिळवण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते. दररोज या स्तोत्राचे पठण केल्यास विद्यार्थ्यांना विशेषतः अभ्यासात चांगला लाभ होतो.लहान मुलांनी तर विशेषतः या स्तोत्राचे नियमित पठण करावे, जेणेकरून बुद्धी, स्मरणशक्ती, आणि एकाग्रता यांचा विकास होतो.
प्रज्ञा विवर्धन स्तोत्र कधी पठण करावे?
गुरुपुष्य किंवा रवीपुष्य योगावर सूर्योदयाच्या वेळी प्रारंभ करून पुढील गुरुपुष्य पर्यंत पिंपळाच्या झाडाखाली बसून 28 वेळा जप करावा . सत्तावीस दिवसात पुनश्चरण होते . नंतर देवघरात बसून रोज पाठ करावा . याने बुद्धी तेज होते व परीक्षेमध्ये यश मिळते .खाली दिलेल्या स्तोत्राचा संकल्प पूर्वक पाठ केल्यास लहान मुलांची बुद्धी स्मरणशक्ती आणि एकाग्रता यांचा विकास होतो
अस्य श्रीप्रज्ञाविवर्धन-स्तोत्र-मंत्रस्य सनत्कुमारऋषि:।
स्वामी कार्तिकेयो देवता। अनुष्टुप् छंद:।
मम सकल विद्यासिद्ध्यर्थं जपे विनियोग:।
श्रीस्कंद उवाच।।
योगीश्वरो महासेन: कार्तिकेयोSग्निनन्दन:।
स्कंद:कुमार: सेनानी: स्वामिशंकरसंभव: ।।१।।
गांगेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वज:।
तारकारिरुमापुत्र: क्रौंचारिश्च षडानन: ।।२।।
शब्दब्रह्मसमुद्रश्च सिद्ध:सारस्वतो गुह:।
सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षफलप्रद: ।।३।।
शरजन्मा गणाधीशपूर्वजो मुक्तिमार्गकृत्।
सर्वागमप्रणेताच वांछितार्थप्रदर्शन: ।।४।।
अष्टाविंशति नामानि मदीयानीति य: पठेत्।
प्रत्यूषं श्रद्धयायुक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् ।।५।।
महामंत्रमयानीति मम नामानुकीर्तनम्।
महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा ।।६।।
|| इति श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्रं संपूर्णम् ||
विविध स्तोत्रांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी तसेच विविध पूजा आणि धार्मिक विधी शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी नमो गुरुजीला संपर्क साधावा.

Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा
