तुळशी विवाहाच्या मंगलाक्षता
१।। यांवे श्री गणनायका तवपदी भावे असो वंदना
यावे श्री शिवशंकर प्रभु तुम्ही घेवूनी देवगणा
ये तुहि जय अंबिके निजगृही सत्कार्य आरंभिले
बोला एक सुरात सर्व मिळून कुर्यात सदा मंगलम ।
राधा दामोदर विवाह शुभं भवतू सावधान ।। १।।
२।। आली हि वधू मंडपात जन हि यावे सुशोभावया
देवकिनंदन श्री कृष्ण वर हा, नेमस्त हो जाहला
श्री कृष्ण तुळशी विवाह घडतो कार्तिक मासातला
आनंदे म्हणे सर्व हि मिळूनीया कुर्यात सदा मंगलम ।।
राधा दामोदर विवाह शुभं भवतू सावधान ।। २।।
३।। रामा ला जशी जानकी शुभ मुखी चंद्रा सवे रोहिणी
वैदर्भी दमयंती हि तशी नला मेघास सौदामिनी
तैसी जोडी अजोड हि दिसतसे, कृष्णासवे तुळशी
कृष्ण भक्त मनी सदैव जडू दे कुर्यात सदा मंगलम ।।।
राधा दामोदर विवाह शुभं भवतू सावधान ।। ३।।
४।। धुळीला उधळीत या धेनू सरकतसे घरी
सृष्टीच्या नभ मंडपात सजली दिपावली साजरी
ऐसा गोरज हा मुहूर्त सजतो देवेंद्र कृष्ण घरी
राधा कृष्ण स्मरा मनात सगळे कुर्यात सदा मंगलम ।।
राधा दामोदर विवाह शुभं भवतू सावधान ।। ४।।
५।। आई तुळशी ! द्वारकाधिश तुम्हा आहे अशी प्रार्थना
दावा मार्ग सदैव नीट जगी या, आम्ही कुठेहि असोत ।
गोविंद भजनी सदा मन रमो, कुर्यात सदा मंगलम ।।
राधा दामोदर विवाह शुभं भवतू सावधान ।। ५ ।।
समारोप (Conclusion)
तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव ।
विद्या बलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतेः तेऽङ्घ्रियुगं स्मरामि ॥
बोर भाजी आवळा कृष्ण देव सावळा
तुळशिचे लग्न टळतील विघ्न.
।। श्री स्वामी समर्थ।।

Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा
