वटपौर्णिमा २०२५: तिथी, महत्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी – संपूर्ण माहिती
वटपौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी खूप खास असतो. हा सण पती-पत्नीच्या अतूट नात्याचे, प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. यंदा ही वटपौर्णिमा कधी आहे, तिचं महत्व काय आहे आणि पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
वटपौर्णिमा केव्हा आहे? (Vat Purnima 2025 Date)
हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा (Vat Savitri Purnima) साजरी केली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत करतात. यावर्षी वटपौर्णिमा मंगळवार, १० जून २०२५ रोजी आहे!
वटपौर्णिमा तिथी आणि वेळ (Vat Purnima 2025 Tithi and Time)
पौर्णिमा तिथी सुरू: १० जून २०२५, सकाळी ११:३५ वाजता
पौर्णिमा तिथी समाप्त: ११ जून २०२५, दुपारी १:१३ वाजता
वटपौर्णिमा शुभ मुहूर्त (Vat Purnima 2025 Shubh Muhurat)
वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त खालीलप्रमाणे आहे:
शुभ मुहूर्त: सकाळी ११:३५ ते पूर्ण दिवस भर आहे.
वटपौर्णिमेचे धार्मिक महत्व (Significance of Vat Purnima)
वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यामागे एक खास धार्मिक महत्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार, याच दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते. सावित्रीच्या पतीनिष्ठेमुळे आणि दृढ संकल्पामुळे यमराजाला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. त्यामुळे, सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि व्रत ठेवतात.
सावित्रीने ज्या दिवशी आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले, तो दिवस म्हणजे ज्येष्ठ मासातील पौर्णिमा. म्हणूनच या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. असे म्हणतात की, या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवल्यास, त्यांना तोच पती सात जन्मांसाठी मिळतो. तसेच, सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर आपली कृपा ठेवते, अशीही मान्यता आहे.
वटपौर्णिमा पूजा कशी करावी? (Vat Purnima Puja Vidhi)
वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी खालीलप्रमाणे पूजा करावी:
सकाळची तयारी: सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि घरातील देवपूजा करावी.
उपवास: या दिवशी उपवास करावा.
वडपूजेची तयारी: वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणे हे धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचे आहे. त्यामुळे वडपूजेसाठी खालील सामग्री तयार ठेवावी:
धूप, दीप (दिवा), अगरबत्ती
हार, फुले
पाच फळे (विशेषतः आंबा आणि जांभूळ,फणस )
नैवेद्यासाठी प्रसाद (उदा. पुरणपोळी किंवा गोड पदार्थ)
हळद-कुंकू, अक्षता, चंदन
सुवासिनीच्या शृंगाराचे सामान (उदा. बांगड्या, टिकली, गळेसर)
वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा धागा (सूत)
विड्याची पाने, सुपारी, नारळ,सुट्टे पैसे
तांब्याभर पाणी
पूजा विधी:
शुभ मुहूर्त पाहून वडाच्या झाडाजवळ जावे.
या वेळी सुवासिनींनी चांगला साजशृंगार करावा. सोळा शृंगार करून भरजरी साडी किंवा लग्नातील शालू परिधान करण्याची प्रथा आहे. हातात बांगड्या, कपाळी टिकली, भांगेत कुंकू, मंगळसूत्र आणि पायात जोडवी-पैंजण असा शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे.
वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे.
हळद-कुंकू, अक्षता, फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करावा.
वडाच्या झाडाला पांढरा धागा गुंडाळत सात प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेवेळी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.
सावित्री आणि सत्यवानाची कथा वाचावी किंवा श्रवण करावी.
आरती करावी आणि देवाला नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा.
पूजेनंतर उपस्थित सुवासिनींना हळदी-कुंकू लावावे आणि फळांचा प्रसाद वाटावा.
वट सिंचामि ते मूलं सलिलैरमृतोपमैः।
यथा शाखाप्रशाखाभिर्वृद्धोऽसि त्वं महीतले।।
तथा पुत्रैश्च पौत्रैश्च सम्पन्नं कुरु मां सदा ।
अवैधव्यं च सौभाग्यं देहि त्वं मम सुव्रते ॥
व्रत कसे करावे? (How to observe Vat Purnima Vrat)
सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवले, त्यामुळे विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात.
अनेक जणी हे व्रत निर्जल (पाणी न पिता) ठेवतात.
काही जणी दिवसभर फलाहार घेऊन किंवा एक वेळ जेवण करून उपवास करतात.
हिंदू रीतीनुसार, या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून उपवास करावा आणि वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन उपवास सोडावा. काही जणी संध्याकाळी सूर्यास्तानंतर देखील उपवास सोडतात.
वटपौर्णिमेचे महत्व (Importance of Vat Purnima in Life)
पती-पत्नीचे नाते आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. विवाहाच्या वेळी अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेऊन हे नाते सात जन्मांसाठी घट्ट होते. पौराणिक कथेनुसार, ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले. आपल्या पतीच्या वियोगाने दुःखी झालेल्या सावित्रीने कठोर तपश्चर्या केली आणि आपल्या पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवले.
यामुळे हे सिद्ध होते की, एका सुवासिनीच्या प्रेमात, तिच्या निष्ठेत आणि तिच्या मंगळसूत्रात खूप शक्ती असते. याच कारणामुळे विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवर कायम राहते, अशी मान्यता आहे.
समाप्ती:
अशा प्रकारे, वटपौर्णिमा हा सण आपल्या भारतीय संस्कृतीत पती-पत्नीच्या अतूट नात्याचे, विश्वासाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. या दिवशी व्रत आणि पूजा करून सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि सुखी संसाराची कामना करतात.
जेव्हा आपण शास्त्रोक्त पूजेचा संकल्प करतो, तेव्हा गुरुजींची उपस्थिती अनिवार्य ठरते. आणि अशा प्रसंगी, ‘नमो गुरुजीं’च्या माध्यमातून अनुभवी गुरुजींकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा संपन्न करून घेणे सर्वोत्तम ठरते.
गुरुजी निश्चित करण्यासाठी इथे क्लिक करा

Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा
