षोडश संस्कार - Shodash Sanskar

हिंदू धर्मातील षोडश संस्कार म्हणजेच जीवनातील महत्त्वपूर्ण व धार्मिक संस्कार. महर्षी वेद व्यासांच्या मते, या १६ संस्कारांना जन्मापासून मृत्यूपर्यंत विशेष महत्त्व आहे. हे संस्कार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा भाग असतात. पूर्वजांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी संस्कारांची योजना केली आहे.
गर्भाधान संस्कार हा १६ संस्कारांपैकी पहिला संस्कार म्हणून ओळखला जातो. वैवाहिक जीवनात गर्भाधान संस्कार खूप महत्त्वाचा मानला जातो. पालकांना चांगले मूल हवे असेल तर त्यांनी गर्भाधान संस्कारापूर्वी आपले मन आणि शरीर शुद्ध केले पाहिजे. गर्भाधान संस्काराला वैदिक काळात खूप महत्त्वाचे मानले जात होते. प्राकृतिक दोष टाळण्यात गर्भाधान संस्कार महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे गर्भधारणा सुरक्षित राहते. आणखी वाचा…
पुंसवन संस्कार हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे जो गर्भावस्थेतील दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात केला जातो. या संस्काराचा मुख्य उद्देश गर्भातील बालक आरोग्यपूर्ण व बुद्धिमान व्हावे आणि त्याला शारीरिक व मानसिक शक्ती मिळावी हा आहे. आणखी वाचा…
हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी तिसरा संस्कार असून पुंसवन कर्मासारखाच करावयाचा हा संस्कार आहे. हा संस्कार गर्भ राहिल्यानंतर तिसऱ्या महिन्यात करावा. आश्वलायन गृह्यसूत्रांत पुंसवन संस्कारानंतर हा संस्कार सांगितला आहे. वीर्यवान,पराक्रमी तथा इंद्रीयविजयी संतती निर्माण व्हावी असा या संस्कारामागचा अर्थ आहे. आणखी वाचा…
सीमंतोन्नयन हा संस्कार आश्वलायन गृह्यसूत्र या ग्रंथात सोळा संस्कारांपैकी चौथा आणि महत्त्वपूर्ण संस्कार म्हणून वर्णन केलेला आहे. या संस्काराचे मुख्य उद्दिष्ट गर्भवती स्त्रीला मानसिक आणि शारीरिक शांती मिळावी आणि गर्भावस्थेत सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे हा आहे. आणखी वाचा…
जातकर्म हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी पाचवा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण संस्कार आहे. हा संस्कार एका अपत्याच्या जन्मानंतर केला जातो. . जातकर्म संस्कारामुळे नवा जन्म घेणाऱ्या बालकाला दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि शारीरिक व मानसिक आरोग्य प्राप्त होईल, अशी श्रद्धा आहे. आणखी वाचा…
नामकरण हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी सातवा संस्कार आहे. या संस्कारात, जन्मानंतर बालकाला एक योग्य आणि शुभ नाव दिले जाते. हे संस्कार सर्वांत महत्त्वाचे मानले जातात, कारण नावात अत्यधिक शक्ती असते आणि ते व्यक्तीच्या भविष्यावर प्रभाव टाकते. पुरुषांच्या नावात समसंख्यांक व स्त्रियांचे नावात विषमसंख्यांक अक्षरे असावी असा सर्वसधारण नियम आहे. आणखी वाचा…
सूर्यावलोकन हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि पारंपारिक संस्कार आहे, जो विशेषतः बालकाच्या जीवनातील प्रारंभिक काळात केला जातो. सूर्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे आणि त्याला जीवनदाता, तेजस्वी आणि पवित्र मानलं जातं. पूर्वीच्या काळात, जेव्हा नवजात बाळ आणि त्याची माता अंधाऱ्या खोलीत विश्रांती घेत असत, तेव्हा या संस्काराचा एक उद्देश बालकाला आणि मातेला प्रकाश, उर्जा आणि जीवनाच्या सकारात्मकतेचा अनुभव देणे हा असावा. आणखी वाचा…
निष्क्रमण हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी आठवा संस्कार आहे. या संस्काराचा मुख्य उद्देश बालकाला बाहेरच्या वातावरणाचा अनुभव देणे आणि त्याला उघड्या आकाशात, सूर्यप्रकाशात ठेवणे असतो. निष्क्रमण संस्काराच्या माध्यमातून बालकाला बाह्य जगाची ओळख होते आणि त्याच्या शरीरातील उर्जा, शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारते. आणखी वाचा…
अन्नप्राशन संस्कार हा एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे जो बालकाच्या जीवनात एक नवीन आणि योग्य आहाराची सुरूवात करताना केला जातो. यामुळे शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळते आणि कुटुंबातील एकतेला बळ मिळते. हा संस्कार एक धार्मिक आणि पारंपारिक दृष्टीकोनातून बालकासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण असतो. आणखी वाचा…
वर्धापन संस्कार हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे. जन्मल्यानंतर एक सौरवर्ष पूर्ण झाल्यावर बालकाच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्मनक्षत्राच्या दिवशी करावयाचा हा संस्कार आहे. या वेळी विशेष पूजा, मंत्रोच्चार आणि व्रत यांचे आयोजन केले जातो. आणखी वाचा…
चूडाकर्म संस्कार किंवा मुंडन संस्कार हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी अकरावा संस्कार आहे. चूडाकर्म संस्कारामागे मुख्यतः शुचिता आणि शुद्धीकरणाची संकल्पना आहे. मुलाच्या जन्माच्या वेळी उगवलेले डोक्यावरील केस दूषित मानले जातात कारण ते आईच्या गर्भात नऊ महिने राहिल्याने त्यावर विविध प्रभाव पडलेले असतात. या संस्काराच्या माध्यमातून हे दूषित आणि अपवित्र केस काढून टाकले जातात, जेणेकरून शारीरिक आणि मानसिक शुद्धता मिळवता येते.शास्त्रानुसार मुलगा असल्यास ६, ८, १० इत्यादी सम मासात, तर मुलगी असल्यास १, ३, ५ इत्यादी विषम मासात जावळ काढावे. रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे होते, त्या सुमारास त्याचे जावळ काढतात. आणखी वाचा…
अक्षरारंभ संस्कार एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे जो मुलाच्या शिक्षणाच्या प्रारंभाचा प्रतीक आहे. याच्या माध्यमातून मुलाला शालेय जीवनाच्या सुरुवातीला योग्य मार्गदर्शन, धार्मिक आशीर्वाद, आणि सकारात्मक विचार मिळतात. सर्व देवतांची पूजा, तसेच ॐ आणि इतर अक्षरे शिकवून, बालकाच्या शैक्षणिक जीवनची सुरवात होते. योग्य दिवशी व वारी, शुभ योग, शुभ पक्ष इत्यादी बघून सुरुवात करावी. या वेळी गणपती, लक्ष्मी, विष्णू, सरस्वती, वेद, गुरूजन, ब्राह्मण यांचे पूजन करून त्यांना वंदन करावे. सर्वप्रथम, ॐ लिहून मग दुसरी अक्षरे लिहावी. आणखी वाचा…
मुंज/उपनयन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी तेरावा संस्कार आहे. सर्व सोळा संस्कारात उपनयनसंस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो. तसेच त्याला वैदिक धर्मात सांगितलेली कर्मे करण्याचाही अधिकार प्राप्त होतो. आणखी वाचा…
समावर्तन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी चौदावा संस्कार आहे. यास सोडमुंज असेही म्हणतात. गुरुकुलातून अभ्यास संपवून परत स्वतःच्या घरी परत येण्यापूर्वी गुरू सर्व शिष्यांचा समावर्तन संस्कार करीत असत. आणखी वाचा…
हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारां पैकी पंधरावा संस्कार आहे. विवाहाची इच्छा असणारे उपवर स्त्री आणि पुरुष – ब्राह्मण, नातेवाईक आणि अग्नी यांचा साक्षीने पती पत्नी म्हणून एकत्र येतात त्या संस्काराला विवाह असे म्हणतात. हिंदू समजुतींनुसार मानवी जीवनास (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम व वानप्रस्थाश्रम) या चार आश्रमांत विभागले गेले आहे. त्यांतील गृहस्थाश्रमासाठी पाणिग्रहण संस्कार/विवाह हा अत्यावश्यक आहे. आणखी वाचा…
अंत्येष्टी संस्कार हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी शेवटचा संस्कार आहे. याला मृत्यू संस्कार किंवा अंतिम संस्कार असेही म्हटले जाते. या संस्काराद्वारे व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीराचे योग्य व धार्मिक पद्धतीने अंतिम संस्कार केले जातात. याचा उद्देश मृत व्यक्तीला शांति, मोक्ष आणि पुण्य प्रदान करणे असतो. आणखी वाचा…
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा