उदक शांती - Udak Shanti Puja

उदक शांती म्हणजे कुटुंबातील किंवा व्यक्तीच्या जीवनात शांती, आरोग्य, समृद्धी आणि दोष निवारणासाठी केली जाणारी वैदिक पूजा आहे. या पूजेत पवित्र पाण्याचा (उदक) उपयोग करून विविध देवता, ग्रह, आणि निसर्ग शक्तींचे आह्वान केले जाते. उदक शांती प्रामुख्याने ग्रहदोष निवारण, वास्तुदोष निवारण, आणि नवीन सुरुवातीसाठी केली जाते.नवीन घरात रहायला जायचे असल्यास आपण वास्तुशांती करून रहायला जातो पण जर मुहूर्त नसेल तर उदक शांती करून शुध्दीकरण झाल्यावर आपण रहायला जाउ शकतो.
- नवीन व्यापारीक स्थान असेल ते आधी कोणी कसे वापरले हे आपणास माहिती नसते तीथे सुद्धा आपण उदक शांती करु शकतो
- घरी सुतक झाल्यावर त्रयोदश श्राद्ध करुन मग चौदाव्या दिवशी आपण शुद्धीकरण साठी उदकशांती करतो
- उदकशांती चे अजुन महत्वाचे फायदे म्हणजे घरातील नकारात्मक शक्तीचा नाश होउन दैविय उर्जेचे संपादन होते घरातील अशांति नाहिशी होउन प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होते
सामुग्री – | ||
गणपती | तुप वाती 01 नग | फळे 05 नग |
शंख | गुलाब पाणी 01 बाटली | मध 01 बाटली |
घंटी | गंगाजळ 01 बाटली | एक वाटी तांदुळचा शिजवलेला भात |
हळद 20 ग्रॅम | अगरबत्ती 01 पुडा | आसने 04 नग |
कुंकू 20 ग्रॅम | मोठ्या सुपार्या 35 नग | ताम्ह्न 02 नग |
गुलाल 20 ग्रॅम | खडीसाखर 100 ग्रॅम | तांब्याचे तांबे 02 नग |
अष्टगंध 20 ग्रॅम | सुके खोबरे 02 नग | पळी 02 नग |
चंदन पावडर 20 ग्रॅम | गुळ 100 ग्रॅम | भांडे ( पंचपात्री ) 02 नग |
पिवळी मोहरी 10 ग्रॅम | नारळ 05 नग | स्टिलची ताटे 01 नग |
शतावरी 10 ग्रॅम | तांदुळ 05 किलो | समई 01 नग |
सप्तमृत्तिका 10 ग्रॅम | पत्रावळी 02 नग | निरांजन ( तेलाचे व तुपाचे ) प्रत्येकी 01 नग |
रांगोळी 200 ग्रॅम | द्रोण 15 नग | पंचामृत 01 वाटी |
गोमुत्र 01 बाटली | पंचे 01 नग | सुट्टे पैसे 50 नाणी |
सुतगुंडी 01 नग | धोतर पान 01 नग | गोमय ( गाईचे शेण ) 01 वाटी |
पंचरंगी धागा 01 नग | ब्लाऊज पिस 02 नग | लिंबु 02 नग |
अत्तर 01 बाटली | विविध प्रकारची सुवासीक फुले 1/2 किलो | पातेल 01 नग |
जानवी जोड 05 जोड | बेल पत्र 21 नग | दही भाताचा नैवेद्य |
गुग्गुळ 50 ग्रॅम | तुळस 01 जुडी | ब्रम्ह प्रतिमा 01 नग |
धुप 50 ग्रॅम | दुर्वा 01 जुडी | |
माचिस 01 नग | फुलांचे हार 01 नग | |
कापुर 50 ग्रॅम | आंब्याचे डहाळे 02 नग | |
तेल वाती 01 नग | विड्याची पाने 25 नग |
संपर्क माहिती
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा