Home>विविध अभिषेक – Vividh Abhishek

विविध अभिषेक - Vividh Abhishek

vividh-abhishek

दुर्गा अभिषेक - Durga Abhishek

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विविध देवतांना विविध सूक्त, स्तोत्रे म्हणत स्नान म्हणजेच अभिषेक करणे हे मोठे पुण्यदायी व इच्छित मनोकामना पूर्ण करणारे कर्म म्हणून सांगितले गेले आहे. काही जणांकडे घरातील देवांना वर्षातील ठराविक दिवशी अभिषेक करण्याची प्रथा असते. मंगळवार/शुक्रवार अथवा पौर्णिमेस देवीला अभिषेक करणे विशेष पुण्यकारक समजले जाते.

श्री सूक्त आवर्तन अभिषेक - Shree Sukt Avartna Abhishek

श्री सूक्त आवर्तन अभिषेक हा एक अत्यंत पवित्र व फलदायी धार्मिक विधी आहे, जो महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि धन, संपत्ती, सुख-समृद्धी, आणि शांती मिळवण्यासाठी केला जातो.देवीसाठी विशेष श्री सूक्त याची 16 आवर्तन स्वरूपात अभिषेक केला जातो आणि देवीची पूजा केली जाते.

दत्तमहाराज / सद्गुरू अभिषेक - DattaMaharaj / Sadguru Abhishek

कलियुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच आपल्या वास्तूतील दोष कलह यांचा परिहार करण्यासाठी सर्व विघ्ने दूर होण्यासाठी सर्व रोग नाहीसे होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी आणि विद्या लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी श्री दत्त महाराज किंवा सद्गुरु यांच्या वरती रुद्र अभिषेक किंवा पवमान अभिषेक करण्याची पद्धत आहे हे केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात.

गणेश सहस्त्र आवर्तन अभिषेक - Ganesh Sahastra Avartan Abhishek

गणपती ही बुद्धीची देवता आहे त्याचप्रमाणे विघ्नहर्ता आणि शुभकारक अशी ही देवता मानली जाते प्रामुख्याने घरातील अडथळे दूर करण्यासाठी सर्व प्रकारच्या यशप्राप्तीसाठी आणि सर्वतोपरी समृद्धीसाठी तसेच सर्व इच्छित कामना परिपूर्णतेसाठी गणपती देवतेवर श्री गणेश अथर्वशीर्ष तसेच गणपती सूक्त ब्रह्मणस्पती सूक्त अशा विविध मंत्राद्वारे गणपतीची 16 उपचारांनी विधिवत पूजा करूनया पूजेमध्ये दूध, पाणी, फळांचा रस यांसारख्या विविध पदार्थांनी अभिषेक करण्याची पद्धत प्राचीन काळापासून चालत आली आहे.असे पूजन केल्याने गणेश देवतेची सर्व कुटुंबावर अखंड कृपादृष्टी होते.

लघुरूद्र अभिषेक - Laghurudra Abhishek

कलीयुगामध्ये जीवनातील विविध अडचणी, वास्तुदोष, आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी, वाद-कलह यांवर मात करून शांती, समृद्धी आणि मनःशांती मिळविण्यासाठी रुद्राभिषेक हे एक अत्यंत प्रभावी अनुष्ठान आहे.रुद्र एकादशिनी अभिषेक :- (रुद्र -एकादशिनी ) - ११ आवर्तने, लघुरुद्र अभिषेक :- (लघुरुद्र ) -१२१ आवर्तने, महारुद्र अभिषेक:- (महारुद्र) - १३३१ आवर्तने, अतिरुद्र अभिषेक :- (अतीरुद्र) - १४६४१आवर्तने. अशा प्रकारात आवर्तने करायची पद्धत प्रचलित आहे

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.

गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!