विविध पूजन - Vividh Pujan

दत्त जयंती पूजन - Datta Jayanti Pujan
धर्म ग्रंथानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी भगवान दत्तात्रयचा जन्म झाला होता. श्रीदत्तात्रयांचे स्वरूप त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असलेले ब्रह्मा-विष्णू-महेश अशा स्वरूपाचे आहे. सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण, तसेच या गुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्त होत. निर्मिती-पालन-संहार हे त्यांचे कार्य होय. देव आणि मुनिवर त्यांचे ध्यान करतात. दत्ताची उपासना तीन प्रकारे करता येते. गायत्री मंत्र वा गुरुमंत्राचे स्मरण, श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण सेवेतून ही उपासना होते.
धन्वंतरी पूजन - Dhanvantari Pujan
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी करतात. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवान धन्वंतरी यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य आहेत. आयुर्वेदाची देवता म्हणजेच धन्वंतरी होय. धन्वंतरी म्हणजे भगवान विष्णूंचे अंशावतार मानले जातात.
दुर्गा पूजन - Durga Pujan
दुर्गा पूजा हा एक प्रमुख हिंदू सण असून हा सण प्रामुख्याने भारतीय उपखंडात, विशेषत: भारतीय राज्य पश्चिम बंगाल आणि शेजारील बांगलादेशात साजरा केला जातो. हे सन देवी दुर्गाला समर्पित आहे, ज्याला दैवी शक्तीचे अवतार मानले जाते आणि दुर्गा माता वाईटाचा नाश करते.दुर्गापूजा फक्त धार्मिक सण नसून एक सांस्कृतिक नवरात्र उत्सवही आहे. हे दुर्गा देवीच्या महिषासुरावर विजय साजरा करण्यासाठी वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
कालाष्टमी पूजन - Kalashtami Pujan
कालाष्टमी हा सण दर महिन्याला कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी कालभैरवाची पूजा करण्याची परंपरा आहे. रात्री कालाष्टमीची पूजा करण्याची परंपरा आहे.कालाष्टमी हा सण दर महिन्याला कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी कालभैरवाची पूजा करण्याची परंपरा आहे. रात्री कालाष्टमीची पूजा करण्याची परंपरा आहे. कालभैरवाची पूजा केल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात आणि शत्रूपासून मुक्ती मिळते.
शिवरात्र पूजन - Shivratra Pujan
महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या चार प्रहरांत शिवलिंगाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रत्येक प्रहरात अभिषेक आणि पूजा करणे शक्य असल्यास अधिक फलदायी ठरते.पूजेमुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. जीवनातील संकटांवर मात करण्यासाठी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.
शिवरात्र याम पूजन - Shivratra Yaam Pujan
शिवरात्र पूजेमध्ये चार यामांचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक याममध्ये भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते.रात्रभर जागरण करा, शिव मंत्रांचा जप करा आणि ध्यान धरा. हे सर्व केल्याने भगवान शिवाचे आशीर्वाद लाभतात आणि जीवनात सुख-शांती प्राप्त होते.
होलिका पूजन - Holika Pujan
फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी, तिला हुताशनी पौर्णिमा, शिमगा असे ही म्हणतात. अपप्रवृत्तीचा नाश करून त्यावर विजय मिळवल्याचा हा उत्सव म्हणजे होलीकोत्सव.फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला येणारा सण म्हणजे 'होळी.' देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा, पद्धत वेगळी असली, तरी उत्साह मात्र शिगेला पोहोचलेला असतो. पहिल्या दिवशी होलिका दहन होते. तर दुसऱ्या दिवशी असते धुळवड, ज्याला आपण रंगपंचमी म्हणतो.
नवीन व्यवसाय पूजन - New Business Pujan
नवीन व्यवसाय कार्यालय दुकान याची नव्याने सुरुवात. करण्यापूर्वी वैदिक पद्धतीने पूजा केली जाते त्याच्यामध्ये गणेश लक्ष्मी पूजन कलश पूजन असे केले जाते किंवा काही ठिकाणी उदक शांत जागेच्या शुद्धीसाठी किंवा वास्तुशांती ही करण्याची पद्धत आहे यामुळे व्यवसायाला भरभराटी येते.
गंगा पूजन - Ganga Pujan
ज्या सप्त नद्या सांगितल्या आहेत त्यापैकी कोणत्याही नदीचं जल घरी घेऊन आल्यावर तिचे गंगा स्वरूप पूजन करण्याची रूढी परंपरा आहे. हे पूजन केल्याने घरामध्ये सदा सर्वदा सुख शांती समृद्धी नांदते.
राम नवमी पूजन - Ram Navami Pujan
चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी असे म्हटले जाते. या दिवशी कौसल्येने भगवान श्रीरामाला जन्म दिला होता. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता.
सत्यनारायण पूजनासह गौरी पूजन - Satyanarayan Pujan & Gauri Pujan
सत्यनारायण पूजनासह गौरी पूजन ही एक विशेष पूजा आहे जी प्रामुख्याने भाद्रपद महिन्यातील गणपती उत्सवामध्ये केली जाते. गौरी ही देवी पार्वतीचे एक रूप असून ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौरी या दोन रूपांत तिची पूजा केली जाते. गौरी पूजनाच्या दिवशी सत्यनारायण पूजन करण्याची परंपरा आहे.
हनुमान जयंती पूजन - Hanuman Jayanti Pujan
हिंदू धर्मात बजरंगबलीला संकटांपासून मुक्ती देणारा देव मानला जातो. मंगळवारी हनुमानाची पूजा करणे विशेष फायदेशीर मानले जाते. महाबली हनुमानाला सामर्थ्य, बुद्धी आणि विद्येचे देवता मानले जाते. जो साधक हनुमानजींची खऱ्या श्रद्धेने आराधना करतो, त्याला जीवनात सुख-समृद्धी मिळते.
कुंकुमार्चन पूजा - Kunkumarchan Puja
कुंकुमार्चन पूजा ही देवीची कृपा मिळवण्यासाठी केली जाणारी विशेष पूजा आहे, ज्यामध्ये देवीच्या प्रतिमेला किंवा यंत्राला कुंकू अर्पण करून मंत्रोच्चारासह तिची आराधना केली जाते. या पूजेद्वारे सौभाग्य, समृद्धी, आणि शांती प्राप्त होते.
लक्ष्मीपूजन - Lakshmipujan
आश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन येतं. या दिवशी प्रात:काळी मंगलस्नान करून देवपूजा करावी. प्रदोषकाळी फुलांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, विष्णू इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा करावी. यादिवशी घर-गोठा स्वच्छ करून घरात गोमुत्र शिपंडून घर पवित्र करतात. व्यापारी लोक त्यांच्या वह्या-चोपड्यांची पूजा करतात.
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा