Home>व्रत पूजा – Vrat Puja

व्रत पूजा - Vrat Puja

vrat-puja-udyapan

अनंत चतुर्दशी व्रत उद्यापन व्रत पूजा - Anant Chaturdashi Vrat Udyapan Puja

भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. मुख्यतः हे व्रत गतवैभव परत मिळावे याकरिता केले जाते. या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णु असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत.

अनघा दत्तपूजा पूजन - Anagha Dattapuja Pujan

अविवाहित मुली, कौटुंबिक कलहग्रस्त यांनी अनघा देवीची अर्चना (पूजा) कुंकुमाने केल्यास व्रताचा विशेष प्रत्यक्ष प्रभाव मिळतो. अघ म्हणजे पाप अनघ म्हणजे पापहीन. मन, वाचा आणि कर्माद्वारे आपण प्रत्येक क्षणी अनेक पापे करतो. म्हणूनच हे व्रत सर्व करू शकतात.

गणेश स्थापना - Ganesh Sthapana

भाद्रपद चतुर्थीचे अनन्य साधारण महत्त्व आहे.गणेश स्थापना पूजन हे हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण व्रत आहे. चातुर्मासातील दुसरा महत्त्वाचा महिना म्हणजे भाद्रपद. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे.

गुरुचरित्र ग्रंथ पारायण - Gurucharitra Granth Parayan

गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हा दत्त संप्रदायातील महत्त्वाचा घटक मानला जातो. ७/ १८/ २८/ ३४/ ३७/ ४३/ ५१ दिवस असा ग्रंथाचा पारायण काल सांगितला आहे. दररोज सकाळी अंघोळ, संध्या करून संकल्प करावा. पारायण करणाऱ्या व्यक्तीने हलका आणि पोषक आहार घ्यावा. दिवसभर चिंतन करावे.

नवनाथ ग्रंथ पारायण - Navnath Granth Parayan

श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात एकूण चाळीस अध्याय आहेत. या ग्रंथाचे पारायण नऊ दिवसात पूर्ण करावे. काही साधक या पद्धतीने पारायण न करता रोज ५ ते १०० ओव्या वाचतात. काहीजण रोज एक अध्याय वाचतात. तर काही जण ठराविकच एक अध्याय रोज वाचतात, कारण यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्ठ फलप्राप्तीसाठी आहे.

प्रदोश व्रत पूजा - Pradosh Vrat Puja

भगवान शिवांचा आशीर्वाद असला की दु:खाची तीव्रता कमी होते. तसेच जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग सापडतो. हिंदू शास्त्रानुसार, कोणताही भाविक शिवाची कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच प्रदोष असताना पूजा विधी करतो तेव्हा त्याला लवकर फलप्राप्ती होते. जीवनातील अनेक समस्यांचं सहज समाधान होतं.

ऋषिपंचमी व्रत पूजा - Rushipanchami Vrat Puja

ऋषिपंचमी व्रत पूजा हिंदू धर्मात एक अत्यंत महत्वाचे व्रत आहे, जे विशेषतः ऋषिपंचमी दिवशी केले जाते. ऋषिपंचमी व्रत आपल्या पापांचे निवारण, शुद्धता आणि जीवनातील समृद्धी प्राप्त करण्यासाठी केले जाते. व्रत केल्याने आर्थिक समृद्धी आणि सुख-शांती प्राप्त होते.

संकष्टी चतुर्थी - Sankashti Chaturthi

संकष्टी चतुर्थी एक विशेष हिंदू व्रत आहे, जे भगवान गणेश यांच्या आराधनेसाठी आणि त्यांच्या कृपेने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी केले जाते. या दिवशी विशेषतः चंद्रदर्शन महत्त्वाचे असते. ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी सर्व संकष्टी चतुर्थीच्या दिवसांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

संतान गोपाळ पूजन - Santan Gopal Pujan

संतान गोपाळ पूजन हे एक अत्यंत शुभ व्रत आहे, जे विशेषतः संतान प्राप्तीसाठी आणि संततीच्या सुखासाठी केले जाते. यात भगवान श्री कृष्णाच्या गोपाळ रूपाचे पूजन करून केले जाते. संतान गोपाळ पूजन व्रताच्या माध्यमातून संतती सुख, संतान प्राप्ती आणि कुटुंबातील आनंदासाठी भगवान श्री कृष्णाची कृपा प्राप्त केली जाते.

संतोषीमाता व्रत उद्यापन - Santoshi Mata Vrat Udyapan

संतोषी मातेची दृढ श्रद्धेने व शुद्ध अंतःकरणाने सेवा, भक्ती व उपासना केल्याने दुःख व दारिद्र्य नष्ट होते, सर्व प्रकारच्या क्लेशांचे व संकटांचे निवारण होते, ऐश्वर्य लाभते, वैभव मिळते, लक्ष्मी स्थिर होते, प्रपंचात सौख्य लाभते, समृद्धी येते, यश व कीर्ती वाढते, मानसन्मान व प्रतिष्ठा प्राप्त होते, विद्याभ्यासात प्रगती होते, गृहकलह नाहीसे होतात, घरात आनंदी, प्रसन्न व खेळकर वातावरण निर्माण होते.

सत्यदत्त पूजन - Satyadatta Pujan

हे एक महान प्रभावशाली व समस्त दुःख अरिष्टनाशक दिव्य अस्त्रच आहे. या व्रताच्या अनुष्ठानाने आजवर अनेक जीव सुखी झालेले आहेत. व अजूनही होत आहेत. हे पूजन भगवान श्री दत्तात्रेय किंवा श्री सत्य दत्त यांच्या कृपेने जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी केले जातो. सत्यदत्तव्रत विशेषतः सत्य, धर्म, आणि आध्यात्मिक उन्नती यांच्या साधनेसाठी प्रसिद्ध आहे.

सत्यंबा पूजन - Satyamba Pujan

सत्यनारायण, सत्यविनायकाप्रमाणेच शीघ्र फळ मिळण्यासाठी प्रसिद्ध असणारे हे देवीचे व्रत आहे. सर्व सृष्टीची निर्मिती जिच्यापासून झाली अशी जगन्माता असणा-या महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती स्वरुप देवीची ही पूजा आहे. ह्या व्रताचा महिमा साक्षात देवी भागवत व भविष्योत्तर पुराण ह्या पुराणांमध्ये वर्णिलेला आहे. ह्या व्रताच्या प्रभावानेच स्वतः भगवान शंकर संकटापासून मुक्त झाले व त्यांचा पुत्र कार्तिकस्वामी ह्यास असुरांशी झालेल्या युद्धात विजय प्राप्त झाला असा इतिहास प्रसिद्ध आहे.

सत्यविनायक पूजन - Satyavinayak Pujan

पुराणकाळापासून गणेशभक्तांमध्ये अतिशय लोकप्रिय असणारी ही गणपतीची पूजा आहे. सत्यनारायणाप्रमाणेच अल्पावधीत इच्छित फळ देणारे हे व्रत पुष्टिपति विनायक जयंती (वैशाख पौर्णिमा), चतुर्थी तसेच मंगळवार अथवा शुक्रवारी किंवा इतर कोणत्याही शुभदिवशी करावे.

सोळा सोमवार उद्यापन व्रत पूजा - Sola Somwar Udyapan Vratpuja

सोळा सोमवार व्रत हे विशेषत: भगवान शिव यांच्या पूजेचे एक महत्त्वपूर्ण व्रत आहे. हे व्रत विशेषतः सोमवारी केले जाते आणि त्याचा उद्देश भगवान शिवाच्या कृपेने इच्छाशक्ती पूर्ण करणे, तसेच जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळवणे आहे. सोळा सोमवार व्रत अनेक अर्थाने फलदायी आहे.

उपांग ललिता पूजन - Upang Lalita Pujan

आश्विन शुक्ल पंचमीला उपांग ललि‍तादेवीची पूजा केली जाते. पार्वती देवीला शक्ती म्हटले जाते, म्हणून शक्तीच्या रूपात पार्वतीला ललिता देवी म्हणून पूजले जाते.ललिता पंचमी व्रताचा मुख्य उद्देश जीवनातील समृद्धी, धन, ऐश्वर्य, सुख, आणि मानसिक शांती प्राप्त करणे आहे.

वैभव लक्ष्मी व्रत पूजा - Vaibhavlaxmi Vrat Puja

वैभव लक्ष्मी व्रत पूजा हा एक अत्यंत महत्त्वाचा व्रत आहे जो विशेषत: लक्ष्मी देवीच्या पूजा संबंधित आहे. हे व्रत देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात समृद्धी, ऐश्वर्य, धन, आणि सुख प्राप्त करण्यासाठी केले जाते. लक्ष्मी देवीला "धनाची देवी" मानले जाते, आणि तिच्या पूजेने जीवनातील सर्व प्रकारचे कष्ट आणि संकटे दूर होतात.

वरदशंकर पूजन - Varadshankar Pujan

सत्यनारायण, सत्यविनायकाप्रमाणेच शीघ्र फळ देणारे व लिंगायत अथवा शैव सांप्रदायिक शिवभक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय असणारे व प्रत्यक्ष शंकरांनी ब्रह्मदेवांना सांगितलेले हे व्रत आहे.भगवान शंकराच्या पूजनात वरद शंकर पूजन केले जाते. शिष्यांना भगवान शंकराची वरद रूपातही पूजा करायला आवडते.

हरितालिका व्रत पूजा - Haritalika Vrat Puja

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका` असे म्हणतात.हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात .या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते.

अक्षय कुंभदान अक्षय तृतीया पूजन - Akshaytrutiya Pujan

वैशाख शुद्ध तृतीयेस अक्षय तृतीया म्हणतात. हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे .अक्षय म्हणजे अविनाशी म्हणूनच या दिवशी केलेले होम, हवन, दान, स्नान, तर्पण, पूजा, जप आदी पुण्य कर्म अक्षय टिकते असे शास्त्रसंमत आहे. या दिवशी पितरांसाठी विशेष श्राद्धविधी पूजा ही करतात. दक्षिण भारतात पितरांसाठी कुंभ दान करण्याची पद्धत आहे.

संपर्क माहिती


Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.

गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा

    Construction Landing Page | Developed By Rara Themes Powered by WordPress
    error: Content is protected !!