कर्जमुक्तीसाठी आध्यात्मिक उपाय
कर्जमुक्त होणं ही केवळ आर्थिक गरज नाही, ती एक मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक मुक्तताही असते. कधी वाटतं, “हे कर्ज कधी फेडणार? कोणत्या दिवशी या घेणेकऱ्यांचा त्रास थांबणार?”
हे सगळं थांबू शकतं – पण त्यासाठी सगळ्यात आधी एक गोष्ट मनात ठासून बसवावी लागते.”कर्ज परत द्यायचंच आहे.”ही भावना तुमच्यात असली, नियत साफ असेल, आणि तुम्ही खरंच मार्ग शोधत असाल, तर भगवंत निश्चित मदतीला धावून येतात.भगवान नृसिंह, श्रीमहाविष्णूंचं रौद्ररुप – संकटांचा विनाश करणारे “ “ श्रीनृसिंहऋणमोचनस्तोत्र ’’ या स्तोत्राचा योग्य पद्धतीने व श्रद्धापूर्वक पठण केल्यास परिस्थिती बदलण्यास मदत होते.
तुमचं नक्कीच खूप नुकसान झालं असेल, लोकांनी बदनामी केली असेल, तर हे सगळं ३ ते ६ महिन्यांत बदलू शकतं.स्तोत्राचा पाठ करण्याचे काही नियम आहेत ते खालील प्रमाणे.
– संध्याकाळच्या वेळेत हातपाय धुवून देवासमोर धूप दीप लावावा.
– या स्तोत्राचा पाठ दररोज संध्याकाळी ६ते९ या वेळेत करणे.
– खाली दिलेल्या स्तोत्राचा किमान 11 वेळा पठण करावे.
– आपली इच्छित मनोकामना पूर्ण होईपर्यंत तसेच आपल्यावरील कर्ज संपेपर्यंत हे पाठ चालू ठेवावेत.
– पाठ चालू असेपर्यंत कोणत्याही प्रकारचे मद्यपान मांसाहार करू नये
– काही नियम जे पाळणं अत्यावश्यक आहे:
– प्रवासात असाल तर त्या दिवशी पठण करावयाचे नाही.
– उशिरा घरी आल्यास रात्री हातपाय धुवून पठण करण्यास हरकत नाही शक्यतो खंड पाडू नये.
– अशौच काळात स्तोत्राचा पाठ करू नये.
– आपली इच्छित मनोकामना पूर्ण झाल्यास किंवा अधिकाधिक कर्जाची रक्कम परतफेड झाल्यास एका शुभ दिनी श्री महाविष्णू प्रित्यर्थ सत्यनारायण पूजन करावं.
– स्त्रीयांना मासिक धर्म काळात असताना स्तोत्रवाचनास मनाई आहे.
श्रीनृसिंहऋणमोचनस्तोत्र :
श्रीगणेशाय नमः ।
ॐ देवानां कार्यसिध्यर्थं सभास्तम्भ-समुद्भवम् ।
श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ १॥
लक्ष्म्यालिंगिततवामांगम् भक्तानामभयप्रदम् ।
श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ २॥
प्रह्लादवरदं श्रीशं दैतेश्वर-विदारणम् ।
श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ३॥
स्मरणात्सर्वपापघ्नं कद्रुजं विषनाशनम् ।
श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ४॥
अन्त्रमालाधरं शंख-चक्राब्जा-युधधारिणम् ।
श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ५॥
सिंहनादेन महता दिग्दन्ति-भयदायकम् ।
श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ६॥
कोटिसूर्य-प्रतीकाश-मभिचारिक-नाशनम् ।
श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ७॥
वेदान्तवेद्यं यज्ञेशं ब्रह्मरुद्रादिसंस्तुतम् ।
श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये ॥ ८॥
इदं यो पठते नित्यं ऋणमोचकसंज्ञकम् ।
अनृणीजायते सद्यो धनं शीघ्रमवाप्नुयात् ॥ ९॥
॥ इति श्रीनृसिंहपुराणे ऋणमोचनस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा
