पंचामृताची विशेष माहिती

पंचामृत म्हणजे काय?
पंच + अमृत = पंचामृत. हिंदू धर्मात पंचामृताला “देवांचा अमृतसमान पेय” मानले जाते. हे पाच शुभ आणि सात्विक घटकांनी तयार होते. दूध, दही, तूप, मध आणि साखर. पंचामृताचा उपयोग देवतांना अभिषेक करताना, पूजनात व नैवेद्याच्या स्वरूपात होतो.पंचामृत म्हणजे पाच अमृतांचा संयोग होय.
शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत कसे करावे ?
पंचामृत पिण्याने आपल्या आरोग्याला त्याचे अनेक फायदे पाहायला मिळतात, परंतु हे फक्त तेव्हाच शक्य होत जेव्हा पंचामृत शास्त्रोक्त पद्धतीनेच तयार केले जाते.आयुर्वेदामध्ये पंचामृत प्राशन ही अत्यंत गुणकारी प्रक्रिया मानली गेली आहे. पंचामृत शास्त्रोक्त पद्धतीने तयार करताना त्यातील सगळ्या पदार्थांचे प्रमाण हे अचूक मापानुसारच घेतले पाहिजे. यासाठी जर आपण एक चमचाभर मध घेतले असेल तर त्याच्या दुप्पटीने म्हणजेच दोन चमचा तूप घ्यावे. त्यानंतर तुपाच्या दुपट्टीने साखर घालायची म्हणजेच चार चमचे साखर घालावी. जितक्या प्रमाणात साखर घेतली आहे त्याच्या दुप्पटीने म्हणजेच आठ चमचे दही घ्यावे. याचप्रमाणे जितके दही घेतले आहे त्याच्या दुपट्टीने म्हणजेच १६ चमचे दूध घालावे. अशा प्रकारे आपण शास्त्रोक्त पद्धतीने अगदी परफेक्ट पंचामृत तयार करु शकतो. पंचामृत तयार करताना शक्यतो ते चांदीच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये तयार करावे. स्टीलचे भांडे किंवा तांब्याचे भांडे वापरू नये,यामुळे पंचामृत खराब होण्याचा संभव असतो.तयार केलेले पंचामृत अधिकाधिक गुणकारी तसेच शरीराला बाधू नये म्हणून त्यामध्ये आवर्जून तुळशीचे पान घालावे. पंचामृत तयार करुन बराचवेळ ठेऊ नये ते लगेच पिऊन संपवावे. प्रत्येकवेळी पंचामृत ताजे तयार करून घेऊन प्यावे. पंचामृतात तूप आणि मधाचे प्रमाण सारखे नसावे, थोडे कमी – जास्त असावे. आयुर्वेदानुसार तूप आणि मध जर समप्रमाणात खाल्ले तर ते आरोग्याला अपायकारक ठरु शकते.आता आपण पंचामृत तयार करण्याची शास्त्रोक्त पद्धत किंवा त्याचे प्रमाण कसे घ्यायचे हे बघूया.
साहित्य :-
१.दूध – १६ चमचे
२.दही – ८ चमचे
३.मध – १ चमचा
४.तूप – २ चमचा
५.साखर – ४ चमचे
कृती :- एक मोठं चांदीचं भांड घेऊन त्याच्यामध्ये १६चमचे दूध,त्यानंतर ८ चमचे दही, १ चमचा मध, २ चमचे साजूक तूप आणि त्यानंतर ४ चमचे साखर अशा प्रमाणात घ्यायचे आहे.त्यानंतर अंदाजे १० वेळेस प्रदक्षिण असे पंचामृत चमच्याने ढवळून घ्यायचे आहे.हे मिश्रण एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये एखादे धुतलेले तुळशीचे पान ठेवावे,असे हे गुणकारी पंचामृत तयार होते.
जसे शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत तयार केले जाते तसेच पंचामृत प्राशन करण्यासाठी शास्त्रामध्ये एक मंत्र आहे. पंचामृताचे भांड उजव्या हातामध्ये घेऊन खालील मंत्र एकदा म्हणावयाचा व त्यानंतर पंचामृत प्राशन करायचे आहे.
अकाल मृत्यू हरणं सर्वं व्याधी विनाशनम्। आवाहित पादोदकम् तीर्थं जठरे धारयाम्यहम्।।
अच्यतानंदन गोविन्द नामोच्चारण भेषजात। नश्यन्ति सकला रोगाः सत्यं सत्यं वदाम्यहम्।।
“तीर्थाचा खरा अर्थ तेव्हाच उमगतो, जेव्हा पूजेला लाभतो योग्य मार्गदर्शक — म्हणूनच, पूजन केवळ नमो गुरुजींच्या मार्गदर्शनाखालीच करा!”
Book the Best Guruji, Pandit and Marathi Bhatji for Your Rituals in Dombivli, Thane, Mumbai, Pune, and Nashik.
गुरुजींसाठी खालील फॉर्म भरा